दहावी-बारावी पुरवणी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डिप्लोमासाठी प्रवेश

दहावी व बारावीच्या पुरवणी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. दहावीनंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा व बारावी/आयटीआय नंतरच्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय जागांवर प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी व अर्जनिश्चितीसाठी प्रवेशप्रक्रिया ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रीया नोंदणी व अधिक माहितीसाठी https//dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन शासकीय तंत्रशिक्षणचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोगरे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित