अन्न सुरक्षा दिवशी उपस्थित राहावे
* जिल्हाधिकारी यांचे ग्राम दक्षता समितीला निर्देश
* लाभार्थींनी सात तारखेला धान्याची उचल करावी
यवतमाळ, दि. 23 : ग्राम दक्षता समितीच्या सदस्यांनी 1 ते 7 तारखेपर्यंत संपूर्ण धान्य उचल होण्यासाठी गावामध्ये अन्न सुरक्षा दिवशी उपस्थित राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
शासकीय धान्य गोदाम ते रास्त भाव धान्य दुकानापर्यंत द्वार वितरण अंतर्गत वाहतूक करणाऱ्या वाहनांची अचानक तपासणी करून धान्याची वाहतूक सुरळीत होत आहे किंवा नाही याची दक्षता घेण्याबाबत क्षेत्रिय अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे कार्डधारकांनी याची नोंद घेऊन महिन्याच्या सात तारखेस धान्याची उचल करावी.
जिल्ह्यात 15 ऑक्टोबर 2015 पासून द्वार पोच धान्य वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार शासकीय धान्य गोदाम ते रास्त भाव दुकानापर्यंत द्वार पोच योजनेच्या वाहनाद्वारे धान्याची वाहतूक करण्यात येते. अन्‍न सुरक्षा योजनेंतर्गत दर महिन्याच्या सात तारखेस जास्तीत जास्त नागरीकांकडून धान्याची उचल होणे, सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणि गुणवत्ता नियंत्रण राखण्यासाठी द्वार वितरण अंतर्गत शासकीय धान्य गोदामातून रास्त भाव दुकानात धान्याची पोहोच झाल्याबाबत संबंधित गावातील ग्राम दक्षता समितीच्या 50 टक्के सदस्यांच्या स्वाक्षऱ्या पंचनाम्यावर घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती