कडबाकुटी यंत्रासाठी अर्ज करावेत
 यवतमाळ, दि. 28 : चाऱ्याचा अपव्य टाळणे आणि दुध उत्पादनात वाढ होण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विजेवर चालणारे कडबाकुट्टी यंत्र वापरास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येणार आहे. इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी 15 जुलै पर्यंत संबंधित पशूधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
या योजनेत 50 टक्के अनुदानावर दोन एचपी कडबाकुट्टी यंत्र वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी विहित नमुन्यातील अर्ज पशुधनविकास अधिकारी विस्तार यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आले असून, या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे किमान पाचपेक्षा अधिक पशुधन आणि सिंचनाची व्यवस्था असावी लागणार आहे. संकरीत व सुधारीत पशुधन असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच इच्छुक लाभार्थ्यांकडे वीज जोडणी असावी लागणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी आणि पशूपालकांनी पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन जिलहा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती