रेती घाट परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
            यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यातील रेतीघाटांवरील रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यातील 70 या घाटांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे.
            जिल्ह्यातील पैनगंगा, वर्धा, बेंबळा, अरूणावती, निर्गुडा, वाघाडी, खुनी, विदर्भ इत्यादी नदीनाला पात्रांमध्ये लिलाव झाले नसलेले 37 आणि लिलाव झालेल्या 70 रेतीघाटातून विना परवानगीने यांत्रिक साधनांचा वापर करून अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या घाटांवरील अवैध रेती उत्खननाचे  प्रकार निदर्शनास येत आहे. यावर  प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नदी, नालेपात्रात ट्रक, ट्रक्टर, टिप्पर व तत्सम वाहनांना रेती, वाळूचे अवैध उत्खनन, वाहतूक करणे यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
            जिल्हा दंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार या ठिकाणी विनापरवानगी वाहनास प्रवेश करण्यास बंदी घातली असून तसे आदेश जारी केले आहे. या घाटांवरून अवैध उत्खनन, वाहतूक व साठवणूक होणार नाही यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तालुका दंडाधिकारी यांनी दक्षता घ्यावी, असे सुचित केले आहे. उत्खनन, वाहतूक किंवा साठवणूक आढळल्यास संबंधीत वाहन चालक, मालक यांच्याविरुध्द भादंवि 379, 188 आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 48 (7) व (8) नुसार कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. हे प्रतिबंधात्मक आदेश 30 जून पासून 30 दिवसांसाठी लागू राहितील.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती