दिव्यांगानी शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी कार्यक्रम २९ सप्टेंबरला ; शिधापत्रिकांचे होणार वितरण
यवतमाळ जिल्ह्यातील ज्या पात्र दिव्यांग व्यक्तींकडे अद्यापही शिधापत्रिका नाही किंवा त्यांना अनुज्ञेय लाभ मिळाला नसलेल्या दिव्यांगांनी शिधापत्रिकेसाठी विहित नमुन्यातील अर्ज तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने केले आहे. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या अभियानाच्या अनुषंगाने पुरवठा विभागांतर्गत दिव्यांगाना देण्यात येणारे लाभ अभियान राबवून देण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत व या अभियानाचे आयोजन २९ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत दिव्यांगांना शिधापत्रिकांचे वितरण केले जाणार असून पात्र दिव्यांगांनी शिधापत्रिकेसाठी तात्काळ अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित