दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष आ.बच्चू कडू यांचा दौरा कार्यक्रम

राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू उद्या शुक्रवार दि.२९ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता लोहारा एमआयडीसी येथील चिंतामणी या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित दिव्यांग कल्याण अभियान कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी ४ वाजता जामवाडी येथे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या घरी भेट देतील. सायंकाळी ५ वाजता यवतमाळ शहरातील आझाद मैदान येथे कंत्राटी भरती रद्द बाबतच्या उपोषणास भेट देतील. सायंकाळी ५.३० वाजता समर्थवाडी, नप शाळा क्रमांक १९ येथील नंददिप फाऊंडेशन मनोरुग्ण आश्रमास भेट देतील.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित