निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पोलीस विभागाचा आढावा




यवतमाळ, दि. 13 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 च्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हा नियोजन सभागृहात पोलीस विभागाचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे आदी उपस्थित होते.
निस्पक्ष: आणि मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस विभागाला नागरिकांनी सहकार्य करावे. अप्रिय घटना त्वरीत लक्षात आणून द्याव्यात, आदी सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. तसेच जिल्हाधिकारी यांनी सर्व नोडल ऑफीसर व विभाग प्रमुख यांच्याकडे सोपविलेल्या कामकाजाबाबत चर्चा केली. आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन होईल, कोठेही त्याचा भंग होणार नाही, याबाबत निर्देश दिले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व पोलीस अधिकारी यांना सुचना दिल्या व सतत पेट्रोलिंग चालू ठेवण्याचे निर्देश दिले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी निवडणूकीच्या काळात दारुबंदी पथक योग्य दिशेने काम करेल व त्याकडे आपल्या विभागाचे विशेष लक्ष राहील, असे सांगितले. जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या चेक पोस्टवर अधिकाऱ्यांनी जास्त लक्ष केंद्रीत करून काही गैरप्रकार आढळल्यास तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशा सुचना दिल्या.
यावेळी कायदा व सुव्यवस्था, शस्त्र जप्त, प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपार व इतर अनुषंगिक बाबींचा आढावा घेण्यात आला. बैठकीला वाशिम व कारंजा येथील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय गोगटे आणि अनुप खांडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती