दिव्यांगांनी दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे जिल्हाधिकारी

यवतमाळ,दि.9 नोव्हेंबर (जिमाका): यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्र नसलेल्या दिव्यांगांसाठी 9 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2022 (जागतीक दिव्यांग दिनापर्यंत)या कालावधीमध्ये दिव्यांग व्यक्तीचा शोध घेवून दिव्यांग व्यक्तींची वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय यवतमाळ येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तपासणी करून ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून दिणेकारिता मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. यवतमाळ जिल्हयातील एकुण 1335 दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त केलेले नाही. दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन नोंदणी केलेली असून तपासणी केली नाही अशा दिव्यांगांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामिण भागातील दिव्यांग व्यक्ती करिता संबधीत ग्रामसेवकामार्फत व शहरी भागातील दिव्यांग व्यक्ती करिता मुख्याधिकारी,नगरपरिषद मार्फत शोध घेऊन दिव्यांग व्यक्तींची विशेष मोहिमेतंर्गत तपासणी करून ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेत.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित