दोन दिवसांत 22 पॉझेटिव्ह रुग्णांची कोरोनावर मात

                             
                      
v ॲक्टीव्ह पॉझेटिव्हची संख्या 85 वरून 63 वर
यवतमाळ, दि.10 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या 18 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शनिवारी चार आणि रविवारी 18 असे दोन दिवसांत एकूण 22 जणांचे रिपोर्ट 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' आल्याने या 22 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना आरोग्य पथकाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
रविवारी सुट्टी झालेल्या 18 जणांचे सुरुवातीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. 14 दिवसानंतरच्या नियमानुसार त्यांचे नमुने पुन्हा तपासणीकरीता पाठविण्यात आले. त्याचा रिपोर्ट शासकीय महाविद्यालयाला रविवारी प्राप्त झाला. हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाचे आणि आरोग्य विभागाचे विशेष कौतुक केले आहे.
आयसोलेशन वॉर्डात ॲक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 85 वरून 63 वर आली आहे. तर  सद्यस्थितीत एकूण 98 जण येथे भरती आहेत. यापैकी 17 केसेस प्रिझमटिव्ह आहे. गत 4 दिवसात वैद्यकीय महाविद्यालयाने एकूण 296 नमूने तपासणीकरीता पाठवले. यापैकी 224 नमूने प्राप्त झाले असून 221 नेगेटिव्ह तर नेर येथील 3 पॉझिटिव्ह आहे. सध्यास्थितित 53 नमूने अप्राप्त आहे. काही नमून्यांचे अचूक निदान झाले नसल्याचे महाविद्यालयाने कळविले आहे. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात 45 तर गृह विलगीकरणात 1247 जण आहे.   
उमरखेड़वरून 18 लोकांचे निकट संपर्क शोधण्यात आले असून यापैकी 3 जणांना संस्थात्मक विलागिकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे नमूने तपासणीसाठी आज पठावण्यात येईल. उमरखेड़ आणि महागाव येथून आणखी 15 लोकांचे संस्थात्मक विलागिकरण करण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी आणि आरोग्य पथकाव्दारे आणखी निकट संपर्क शोधण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
000000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती