इतर मागासवर्गीय विकास महामंडळाच्या
बीज भांडवल योजनेसाठी अर्ज आंमत्रित
यवतमाळ, दि 3 ऑगस्ट (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालय यवतमाळ यांचे मार्फत विविध योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराकरीता सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी बीज भांडवल कर्ज योजना 46 भौतिक व 27.42 लक्ष आर्थीक,वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना 119 भौतिक व 135.66 लक्ष आर्थीक, गट कर्ज व्याज परतावा योजना 13 भौतिक व 70.85 लक्ष आर्थीक तसेच वैयक्तिक थेट कर्ज योजना 100 भौतिक व 100 लक्ष व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना 11 भौतिक व 16.50 लक्ष आर्थिक आर्थिक उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनांचे उद्देश, स्वरुप व पात्रतेचे निकष याची सविस्तर माहिती करिता महामंडळाच्या वेबसाईट www.msobcfdc.org या वेबसाईटवर अर्ज करावा. तसेच बीज भांडवल व थेट कर्ज योजने बाबत जिल्हा कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दक्षता भवनच्या मागे, दारव्हा रोड, यवतमाळ येथे तसेच दूरध्वनी क्रमांक 07232-243052 यावर संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्या) यवतमाळ यांनी कळविले आहे.
स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु" ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा शाश्वत विकास साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे. ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी, पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग वाढविणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत सामुदायिक घनकचरा व्यवस्थापन सुविधांचे स्वयंमूल्यांकन व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. कंपोस्ट खड्डे, कचरा वर्गीकरण शेड, कचरा संकलन वाहने तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिट्स यांच्या कार्यस्थितीची तपासणी करण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामीण भागातील जुन्या कचरा डेपोची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांची ओळख पटवून त्यांची यादी तयार केली जाणार आहे. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ मोहिमेदरम्यान घनकचरा व्यवस्थापन नियम २०...
Comments
Post a Comment