तलाव, जलाशयाकरीता नोंदणीकृत संस्थांची यादी जाहीर

जिल्ह्यातील तलाव, जलाशय मासेमारी करीता ठेक्याने देण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र असलेल्या संस्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीवर आक्षेप असल्यास नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन परिपत्रकान्वये जिल्ह्यातील तलाव, जलाशय विनामुल्य, जाहिर लिलाव, निविदा पध्दतीने मारेमारीकरीता ठेक्याने देण्यात येणार आहे. या तलाव, जलाशयावर नोंदणीकृत व सन 2024-25 ते 2028-29 या कालावधीमधील तलाव ठेका घेण्यास पात्र असणाऱ्या संस्थांचा तपशिल प्राप्त झालेला आहे. या जलाशयावर तलाव ठेका घेण्यास पात्र असणाऱ्या संस्थांची नावे जाहीर करण्यात आली आहे. नोंदणीकृत संस्थांबाबत कोणास काही आक्षेप, हरकत असल्यास त्यांनी आपल्या संस्थांचे आक्षेप, हरकती सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) यांच्याकडे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, एमआयडीसी लोहारा येथे दि.24 जून पर्यत आवश्यक कागदपत्रासह सादर करावे. त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही आक्षेप अर्जावर विचार करण्यात येणार नाही, असे सहाय्यक निबंधक डी.व्ही.पाटील यांनी कळविले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित