आर्णी येथील आदिवासी वसतीगृहांसाठी अर्ज आमंत्रित

यवतमाळ, दि.१९ (जिमाका) : आर्णी येथील आदिवासी मुलींचे व मुलांच्या शासकीय वसतीगृहात या शैक्षणिक वर्षाची वसतीगृह ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशासाठी इच्छूक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. मुलांच्या वसतीगृहाची प्रवेश क्षमता ७५ व मुलींच्या वसतीगृहाची क्षमता १२५ अशी आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी, विद्यार्थीनी अनुसूचीत जमातीची असावी. वसतीगृहात विद्यार्थ्यांना निःशुल्क उत्तम राहण्याची व भोजनाची व्यवस्था, निर्वाह भत्ता व ईतर सुविधा पुरविण्यात येते. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येते, असे आर्णीच्या आदिवासी मुले व मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या गृहपालांनी कळविले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित