कोरोनामुक्त 17 जणांना डिस्चार्ज

                                                                              


v पाच पॉझेटिव्ह रुग्णांची भर

यवतमाळ, दि. 12 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 17 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 36 वरून 19 वर आली होती. मात्र पाच जण शुक्रवारी नव्याने पॉझेटिव्ह आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 24 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण आहेत.

सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 24 ॲक्टीव्ह पॉझेटिव्हसह एकूण 30 जण भरती आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी 6 रिपोर्ट प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 2610 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 2598 प्राप्त तर 12 रिपोर्ट अप्राप्त आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 167 वर गेली आहे. यापैकी सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 24 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून आतापर्यंत उपचारामुळे बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 141 वर पोहचली आहे. तसेच जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून 2436 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती