जिल्ह्यात आणखी दोन पॉझेटिव्ह


v 20 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

यवतमाळ, दि. 11 : जिल्ह्यात आणखी दोन जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले असून यात एक पुरुष (वय 50)  आणि एका महिलेचा (वय 40) समावेश आहे. आज पॉझेटिव्ह आलेले दोन्हीही व्यक्ती नेर येथील आहे.  सद्यस्थितीत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 36 ॲक्टीव्ह पॉझेटिव्हसह 47 जण भरती आहेत. यात 11 केसेस प्रिझमटिव्ह आहेत.

गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 22 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन पॉझेटिव्ह तर 20 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहे. महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 2589 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 2581 प्राप्त तर 8 रिपोर्ट अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 162 वर गेली आहे. यापैकी सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 36 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती आहेत. उपचाराअंती बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 124 असून जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. समावेश आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून 2419 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.


Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित