दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना : नोंदणीकरिता 15 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

यवतमाळ, दि. 6 ऑक्टोबर (जिमाका):- भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबळीकरण मंत्रालय, विकलांग व्यक्ती सबळीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्ती, शालांत परीक्षोत्तर ( पोस्ट मॅट्रिक ) शिष्यवृत्ती व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या योजना राबविण्यात येतात. पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (www.scholarship.gov.in) यावर ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्तीसाठी पोर्टलवर अर्ज नोंदणी करण्याकरिता 15 ऑक्टोंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर पात्र दिव्यांग विद्यार्थ्यानी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी पीयूष चव्हाण यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती