पोलिसांनी सेवानिवृत्तीनंतरही समाजसेवेचा वारसा सुरु ठेवावा - संजय राठोड

सेवानिवृत्त पोलीस स्नेहमिलन सोहळा उत्साहात पोलिसांनी सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक जबाबदारी म्हणून समाजसेवेचा वारसा अविरत सुरु ठेवावा, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन यवतमाळद्वारा आयोजित सेवानिवृत्त पोलीस स्नेहमिलन सोहळा येथील सेलिब्रेशन हॉल येथे उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास आमदार मदन येरावार, सेनि पोलीस उपअधीक्षक चंदनसिंग बयास, तारीक लोखंडवाला यांच्यासह सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्याचे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. निवृत्तीनंतरही सामाजिक जबाबदारी म्हणून पोलिसांनी समाजसेवेचा अविरत वारसा सुरु ठेवावा, असे आवाहन केले. या सोहळ्यात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित