जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ माँ साहेब, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

यवतमाळ, दि. 12 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी विकास मिना यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, उपजिल्हाधिकारी पुनम अहीरे, तहसिलदार महसुल राहुल मोरे, अधिक्षक आदित्य शेंडे, आदी उपस्थित होते. उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 000000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित