दिग्रस येथे इंदिरा गांधी योजनांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट शिबीर आयोजन

यवतमाळ, दि. 1 (जिमाका) : दिग्रस नगर परिषद हद्दीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग योजनेतील शहरातील लाभार्थ्यांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट (डी.एल.सी.) शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत नगर परिषद शाळा क्र. ८, संभाजीनगर येथे होणार आहे. सर्व लाभार्थ्यांनी आपले डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काढून घ्यावे, कारण प्रमाणपत्र केल्यानंतरच अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित लाभार्थ्यांनी या विशेष शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मयूर राऊत यांनी केले. 000000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित