बौद्ध समाजातील संस्थांसाठी अनुदान योजना: अर्ज आमंत्रित
यवतमाळ दि.29 (जिमाका) : जिल्ह्यातील बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना उपलब्ध आहे. 10 लाखांपर्यंत अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
संस्था धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असणे आवश्यक व नोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत सादर करणे आवश्यक आहे. संस्थेच्या विश्वस्त,सदस्यामध्ये 51 टक्क्यांपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त,सदस्य आवश्यक आहे, संबंधित संस्थांना केवळ 5 वेळाच अनुदान अनुज्ञेय राहील.
त्यानुसार इच्छुक संस्थांना योजनेचा लाभ घेण्यासाठी नमुद केलेल्या इतर अटी व शर्तीस अनुसरुन विहित नमुन्यातील परिपुर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावे. असे जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी कळविले आहे.
000
Comments
Post a Comment