जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती व कुष्ठरोग निवारण अभियान सुरक्षित महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवा -जिल्हाधिकारी विकास मीना
यवतमाळ, दि.30 (जिमाका) : कुष्ठरोग निवारण दिनानिमीत्त जिल्ह्यात आजपासून ते १२ फेबुवारीपर्यंत " स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान व कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) मोहीम राबविण्यात येणार आहे.
या कालावधीत विविध कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम विविध उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे कुष्ठरोगाबाबत समाजात असलेला भेदभाव गैरसमज समाप्त करण्यासाठी आणि कुष्ठरोगाने नविन रुग्ण शोधणे व त्यांना वेळेत पुर्ण औषधोपचार मिळण्याकरीता सदर अभियानातुन वंचित घटकांची कुष्ठरोगाबाबत तपासणी व कुष्ठरोगाची जनजागृती प्रभाविपणे करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आरोग्य विभागाला दिले.
सदर अभियानाबाबत दि. २९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात " स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान व कुष्ठरोग सुरक्षित नहाराष्ट्र (कुसुम) मोहिमेबाबत जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी विकास मीना यांचे अध्यक्षतेत घेण्यात आली सदर सभेकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. मंदार पत्की, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष केले, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुखदेव राठोड, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. गोपाळ पाटील, शिक्षण अधिकारी (प्राथ.) यांचे सह जिल्हास्तरीय सर्व अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक उपस्थित होते.
अभियानातंर्गत २६ जानेवारी आयोजीत रोजी सर्व ग्रामपंचायत मध्ये आयोजीत ग्रामसभेत व सर्व शासकिय कार्यालयात ध्वजारोहणानंतर कुष्ठरोगाबाबत जिल्हाधिकारी यांचे जनतेस केलेले आवाहन, कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा संरपंच यांचे भाषण, कुष्ठरोग आजाराबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली आहे.
३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधी कुष्ठरोग पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात कुष्ठरोगाबाबत विविध उपक्रमाअंतर्गत कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शाळा व महाविद्यालय येथे प्रार्थनेच्या वेळी कुष्ठरोग प्रतिज्ञेचे वाचन,शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी कुष्ठरोगाबाबत प्रश्नमंजुषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कुष्ठरोगाबाबत नुक्कड नाटक याव्दारे तसेच नागरीकमध्ये जनजागृती करीत महीला बचत गट, महीला मंडळ, भजनी मंडळ, विविध धार्मिक स्थळावरून कुष्ठरोगाबाबत माहीती देणे. बाजारामध्ये कुष्ठरोग प्रदर्शनी लावणे, कुष्ठरोगाबाबत संदेश देणारे पोस्टर, बैनर लावणे, तसेच खाजगी वैद्यकिय व्यावसायीक यांच्या कार्यशाळा घेणे याद्वारे कुष्ठरोग आरोग्य शिक्षण व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) या मोहिमेव्दारे जिल्हयात वरील कालावधीत नियमित विशेष सर्वेक्षणामध्ये वंचित राहणा-या दुर्लक्षित राहणा-या गटावर उमा विटभटटी कामगार, खाण कामगार, स्थलांतरीत व्यक्ती, बांधकाम मजुर, निवासी आश्रम शाळेत राहणारे विद्यार्थी, कंपनीत कारखान्यात काम करणारे कामगार इ.वर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. या गटातील लोक हे कामाकरीता मजुरीकरीता लवकर घर सोडतात व उशिरा घरी परत येतात यामुळे अशा व्यक्तींची आरोग्य तपासणी नियमित सर्वेक्षण अथवा कुष्ठरोग शोध मोहीमे मध्येही होत नाही. याकरीता वेगवेगळया उपेक्षित गटांची माहीती घेऊन आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने प्रत्यक्ष सर्वेक्षण करुन कुष्ठरुग्ण शोधुन त्यांना उपचार देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात २०२७ पर्यंत कुष्टरोग मुक्त करण्याकरीता समाजामध्ये कुष्ठरोग आजाराविषयी जनजागृती करून कुष्ठरोग हा इतर आजाराप्रमाणेच जंतु पासुन होणारा आजार असून बहुविध औषधोपचाराने हा आजार १०० टक्के बरा होतो कुष्ठरोगाचे निदान व औषधोपचार हा सर्व पासकीय दवाखाण्यात मोफत केले जातात. हा आजार देवी कोपामुळे किंवा पापामुळे होत नाही. हा आजार अनुवंशीक नाही. त्यामुळे या आजारबाबत असलेले गैरसमज दुर केले पाहीजेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.
000000

Comments
Post a Comment