बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यावर कायदेविषयक शिबीराचे आयोजन

यवतमाळ दि.30 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष शेखर सी. मुनघाटे यांचे मार्गदर्शनाखाली दि. २३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता बालिका दिन निमित्य "बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२" याविषयावर कायदेविषयक शिबीराचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व स्कुल ऑफ स्कॉलर्स, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कुल ऑफ स्कॉलर्सच्या प्राचार्य रिना काळे तर प्रमुख उपस्थिती उप-प्राचार्य जागृती गंडेजा ह्या होत्या. प्रमुख वक्ते म्हणुन सहाय्यक लोकअभिरक्षक तृप्ती आसावा, आणि जिल्हा समुपदेशक माधुरी कोटेवार यावेळी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जिल्हा ग्रामिण समस्या मुक्ती ट्रस्टच्या जिल्हा समुपदेशक माधुरी कोटेवार यांनी बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा, २०१२ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थीत मुलींना त्यांच्या अधिकारा विषयी समजावून सांगितले. अन्यायावर आवाज उठवण्याकरीता कोणाची मदत घ्यावी आणि प्रत्येक मुल कसे सुरक्षित राहील या बाबतीत विस्तृत माहीती दिली. तसेच त्यांनी फेसबुक, इंन्स्टाग्राम अशा सोशल माध्यमाव्दारे मुलींना यामध्ये कशाप्रकारे फसविल्या जाते याबाबत वेगवेगळे उदाहरण देवून त्यांना समजावून सांगितले व यवतमाळ जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटना बाबत माहिती दिली व त्याबाबत सावधगिरी कशी बाळगावी याविषयी मार्गदर्शन केले तसेच असे काही विद्यार्थीनीसोबत घडत असल्यास त्यांनी आपल्या शिक्षकांना किंवा आई वडीलांना निर्दशनास आणुन द्यावे जेणेकरून समोरील अनर्थ टळू शकतो याबाबत मुलींमध्ये जागरूकता निर्माण केली. काही अनुचित प्रकार घडू नये याकरीता मार्गदर्शन केले. व मनोधैर्य योजने बाबत मुलींना माहिती दिली. तसेच सहाय्यक लोकअभिरक्षक तृप्ती आसावा यांनी राष्ट्रीय लोक अदालत, मध्यस्थी प्रक्रिया आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ या कार्यालयामार्फत लोकांमध्ये कायद्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून वेळोवेळी असे कायदेविषयक कार्यक्रम राबविण्यात येतात याबाबत सांगितले. तसेच विधी सेवा प्राधिकरण तर्फे पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिक्षिका सोनाली सुने यांनी केले. सदर कार्यक्रमाकरीता मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थीनी तसेच शिक्षक वर्ग उपस्थीत होते. 000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …