इयत्ता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणीचे विशेष शिबीर
यवतमाळ, दि. ९ जानेवारी (जिमाका):- इयता ११ वी व १२ वी विज्ञान तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास ईच्छुक विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणी समितीद्वारे शिबीरे आयोजीत केलेली आहे. उमरखेड तालुक्यामध्ये गोपिकाबाई सितारामजी गावंडे महाविद्यालय उमरखेड, जि.यवतमाळ येथे ११ जानेवारीला शिबीराचे आयोजन ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत करण्यात आले आहे.
सदर शिबीरात सन २०२२-२३ मधील ११ वी व १२ विज्ञान शाखेतील प्रवेशीत विद्यार्थी यांनी https:// bartievalidity.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा उपयोग करुन परिपुर्णभरलेला अर्ज व मूळ कागदपत्रासह उपस्थीत रहावे. अर्जदाराचा जातीचा दाखला यवतमाळ जिल्ह्यातील असावा व अर्जदार हा अनुसुचित जाती (SC), विमुक्त जाती, भटक्या जमाती(VJNT), विशेष मागासवर्ग (SBC) व इतर मागासप्रवर्ग (OBC) याच प्रवर्गाचे अर्ज समितीकडुन स्वीकारले जातील व पडताळणी केली जाईल. अधिक माहितीकरीता विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील प्राचार्य यांचेशी संपर्क करावा.
ज्या विदयार्थींचे अर्ज परिपुर्ण असतील त्या विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी आपले जात वैधता प्रमाणपत्र समिती कडुन देण्याचा समितीचा मानस आहे. परिपुर्ण अर्जाकरीता आवशक असलेल्या कागदपत्रे व पुरावा यासाठी https://yavatmal.gov.in/notice_category/announcements/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानुसार कागदपत्रे सादर करावी. प्रत्येक तालुकामध्ये याप्रमाणे शिबीरे आयोजीत केली जातील. यवतमाळ जिल्ह्यातील एकही विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्रा अभावी प्रवेशापासुन वंचीत राहु नये हा शिबीराचा मुळ उद्देश आहे. तरी विद्यार्थ्यांनी शिबीरात मोठया प्रमाणात सहभागी होऊन आपले जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांनी केले आहे.
स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु" ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा शाश्वत विकास साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे. ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी, पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग वाढविणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत सामुदायिक घनकचरा व्यवस्थापन सुविधांचे स्वयंमूल्यांकन व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. कंपोस्ट खड्डे, कचरा वर्गीकरण शेड, कचरा संकलन वाहने तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिट्स यांच्या कार्यस्थितीची तपासणी करण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामीण भागातील जुन्या कचरा डेपोची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांची ओळख पटवून त्यांची यादी तयार केली जाणार आहे. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ मोहिमेदरम्यान घनकचरा व्यवस्थापन नियम २०...
Comments
Post a Comment