अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक_
मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांना दुस-या टप्प्यातील प्रशिक्षण*
आपली जबाबदारी दक्षतापूर्वक पार पाडावी*
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे*
यवतमाळ दि. २४ : निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची जबादारी महत्त्वपूर्ण असून सर्व प्रक्रिया दक्षतापूर्वक पार पाडावी, असे निर्देश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दिले.
अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ व्दिवार्षिक निवडणूक २०२३ कार्यप्रणालीबाबत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे एक दिवसीय दुसरे प्रशिक्षण आज बचत भवन येथे आयोजित करण्यात आले होते. यवतमाळ जिल्ह्यात ४८ मतदान केंद्र असून त्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व संबंधितांच्या ५३ चमू तयार करण्यात आल्या आहेत. त्यातील ५ चमू राखीव ठेवण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेमध्ये २७६ अधिकारी, कर्मचारी सहभागी आहेत. या सर्वांना द्वितीय टप्प्यातील प्रशिक्षण उपजिल्हाधिकारी निवडणुक डॉ. स्नेहल कनिचे आणि तहसिलदार राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीसह उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, नोडल अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रशिक्षणामध्ये मतदानाच्या विविध टप्प्यातील प्रक्रिया पावरपॉईंट प्रात्यक्षिकेव्दारे सादर करण्यात आले. यामध्ये मतदान पध्दतीबाबत सूचना, मतदान प्रतिनिधींना मार्गदर्शक सूचना, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या यासह मतपेट्या उघडणे, बंद करणे, सीलबंद करणे, कागदी सील, पोस्टल बॅलेट, मतपत्रिका व मतदान यादीची तपासणी याबाबत प्रात्यक्षिकेव्दारे माहिती देण्यात आली. तसेच आज डमी मतदान केंद्र उभारुन मतदानाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. शिवाय प्रशिक्षणार्थिंची परीक्षा सुद्धा घेण्यात आली.
मतदान 30 जानेवारीला सकाळी 8 ते 4 या वेळेत होणार आहे. त्यानंतर मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या अनुषंगाने मतपत्रिकेची तपशीलावर माहिती देण्यात आली. मतदार यादी, मतदाराचा अनुक्रमांक याबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे प्रशिक्षकांमार्फत निरसन करण्यात आले.
स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु" ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा शाश्वत विकास साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे. ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी, पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग वाढविणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत सामुदायिक घनकचरा व्यवस्थापन सुविधांचे स्वयंमूल्यांकन व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. कंपोस्ट खड्डे, कचरा वर्गीकरण शेड, कचरा संकलन वाहने तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिट्स यांच्या कार्यस्थितीची तपासणी करण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामीण भागातील जुन्या कचरा डेपोची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांची ओळख पटवून त्यांची यादी तयार केली जाणार आहे. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ मोहिमेदरम्यान घनकचरा व्यवस्थापन नियम २०...
Comments
Post a Comment