राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त रॅलीचे आयोजन
यवतमाळ, दि. २४ जानेवारी (जिमाका):- राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त २५ जानेवारी रोजी रॅलीचे आयोजन करुन मतदान यादीतील नाव नोंदणी व मतदानाचा हक्क याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी आझाद मैदान यवतमाळ येथे सकाळी साडेसात वाजता रॅलीचा शुभारंभ होणार असून यामध्ये ५०० विदयार्थी उपस्थित राहणार आहे. सदर रॅली ही आझाद मैदान-पोलीस स्टेशन यवतमाळ-नेताजी चौक-बस स्टॅन्ड-एल.आय.सी.चौक या मार्गाने मार्गक्रमण करुन बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे सामारोप होणार आहे अशी माहिती तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कुणाल झाल्टे यांनी दिली आहे. नागरिकांनी यात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु" ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा शाश्वत विकास साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे. ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी, पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग वाढविणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत सामुदायिक घनकचरा व्यवस्थापन सुविधांचे स्वयंमूल्यांकन व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. कंपोस्ट खड्डे, कचरा वर्गीकरण शेड, कचरा संकलन वाहने तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिट्स यांच्या कार्यस्थितीची तपासणी करण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामीण भागातील जुन्या कचरा डेपोची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांची ओळख पटवून त्यांची यादी तयार केली जाणार आहे. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ मोहिमेदरम्यान घनकचरा व्यवस्थापन नियम २०...
Comments
Post a Comment