यवतमाळ, दि ३ जाने:- अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतुन यवतमाळ जिल्ह्यात सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत तालुका स्तरीय 'समाधान शिबीर' आयोजित करण्यात येणार होते. ८ व ९ जानेवारी 2023 ला होणारे समाधान शिबीर जिल्ह्यात पदवीधर मतदार संघासाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे.
यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील १३ तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका असल्यामुळे शासकीय यंत्रणा ग्रामपंचायत निवडणुक कामामध्ये व्यस्त होती. तसेच १९ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२२ पर्यंत विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन असल्याने सदर समाधान शिबीर पुढे ढकलण्यात आले होते.
आता २९ डिसेंबरलाच पदवीधर मतदार संघासाठी जिल्ह्यात आचार संहिता लागु झाल्यामुळे समाधान शिबिर आयोजित करता येणार नाही. त्यामुळे ८ व ९ जानेवारीला होणारे समाधान शिबिर पुढे ढकलण्यात आले आहे. पुढिल तारिख निश्चित झाल्यवर कळविण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु" ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा शाश्वत विकास साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे. ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी, पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग वाढविणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत सामुदायिक घनकचरा व्यवस्थापन सुविधांचे स्वयंमूल्यांकन व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. कंपोस्ट खड्डे, कचरा वर्गीकरण शेड, कचरा संकलन वाहने तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिट्स यांच्या कार्यस्थितीची तपासणी करण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामीण भागातील जुन्या कचरा डेपोची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांची ओळख पटवून त्यांची यादी तयार केली जाणार आहे. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ मोहिमेदरम्यान घनकचरा व्यवस्थापन नियम २०...
Comments
Post a Comment