*सैनिक दरबार ६ फेब्रुवारीला*
यवतमाळ, दि ९ जानेवारी (जिमाका) :- माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांच्या कुटूबियांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षते खाली ६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील ज्या माजी सैनिक/सेवारत सैनिक व त्यांचे अवलंबितांच्या वैयक्तिक अडीअडचणी व तक्रार असतील त्यांनी पुराव्यासह सर्व कागदपत्रे, दुरध्वनी क्रमांक व पत्यासह दोन प्रतिमध्ये लेखी स्वरुपात अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे २० जानेवारी २०२३ पुर्वी (कार्यालयीन वेळेमध्ये) सादर करून टोकन प्राप्त करावे.
यापुर्वी लोकशाही दिनात सादर केलेली तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरणे स्विकारण्यात येणार नाही. तसेच मुदतीनंतर अथवा ऐनवेळी दिलेल्या अर्जांचा विचार पुढील तक्रार निवारण आयोजनाचे वेळी करण्यात येईल. यवतमाळ जिल्ह्यातील माजी सैनिक/सेवारत सैनिक यांनी सैनिक दरबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे.
स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु" ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा शाश्वत विकास साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे. ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी, पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग वाढविणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत सामुदायिक घनकचरा व्यवस्थापन सुविधांचे स्वयंमूल्यांकन व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. कंपोस्ट खड्डे, कचरा वर्गीकरण शेड, कचरा संकलन वाहने तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिट्स यांच्या कार्यस्थितीची तपासणी करण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामीण भागातील जुन्या कचरा डेपोची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांची ओळख पटवून त्यांची यादी तयार केली जाणार आहे. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ मोहिमेदरम्यान घनकचरा व्यवस्थापन नियम २०...
Comments
Post a Comment