महात्मा फुले महामंडळातर्फे कर्जाचे फॉर्म वितरण
यवतमाळ, दि. 14 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या यवतमाळ जिल्हा कार्यालयातर्फे तालुकास्तरावर कर्जाच्या फॉर्मचे वितरण करण्यात येणार आहे.
अनूसचित जातीमधील बौद्ध, महार, खाटीक, मेहतर या समाजाती एक लाख रूपयांच्या आत उत्पन्न असलेल्या गरजू लाभार्थींना फॉर्मचे वितरण करण्यात येणार आहे. 15 सप्टेंबर रोजी घाटंजी, 16 सप्टेंबर नेर, 22 सप्टेंबर दारव्हा, 23 सप्टेंबर रोजी आर्णी येथील पंचायत समितींमध्ये कार्यालयीन वेळेत हे फॉर्म वाटप करण्यात येणार असून कर्जाबाबत माहिती, कर्ज प्रकरणे गोळा करणे आदी माहितीसाठी महात्मा फुले महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित