गणेश चतुर्थीनिमित्त मद्यविक्री बंद
यवतमाळ, दि 3 : गणेश चतुर्थी दि. 5 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्यादृष्टीने जिल्ह्यात एक दिवस मद्यविक्री बंदी असणार आहे.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात दि. 5 सप्टेंबर रोजी मद्यविक्रीच्या सर्व प्रकारच्या अनुज्ञप्त्या मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. या दिवशी मद्यविक्री सुरू असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित