Posts

मरावे परी अवयवरुपी उरावे

यवतमाळ, दि. 3 (जिमाका) : अवयवदान हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. अनेकदा तुम्ही अवयवदानाचे आव्हाहन करणाऱ्या जाहीराती सुद्धा पाहील्या असतील की मी मृत्यु नंतर माझे सर्व अवयव दान करणार. त्यावेळी तुमच्याही मनात कित्येक प्रश्न आले असतील की, अवयवदान म्हणजे नेमके काय ? कुणीही व्यक्ती अवयवदान करु शकते का? अवयवदानाची प्रक्रीया काय? मृत्युपश्चात वेगवेगळ्या धर्मात शरीराची विल्हेवाट वेगवेगळ्या प्रकारे लावली जाते. जरी शरीरातुन प्राण गेले असले तरी काही अवयव हे मृत्युनंतर काही काळासाठी सक्रीय असतात त्यांचा जर वेळेत वापर करुन ते अवयव दुसऱ्याच्या शरीरात बसवले तर त्या व्यक्तीला त्या अवयवांचा फायदा होवु शकतो. आज अवयवांची आवश्यकता असलेल्यांची प्रतिक्षा यादी वाढत चालली आहे. यात बदल घडवायचा असेल तर अवयवदानाबाबत जनसामान्यांच्या माणसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. असे मत सामान्य रुग्णालयचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी व्यक्त केले. देशामध्ये अवयवदाना बद्दल जागरुकता पसरवण्यासाठी, अवयवदानाशी संबंधित समज व गैरसमज दुर व्हावे आणि मृत्युनंतर अवयव व उतींचे दान करण्यासाठी नागरिकांत प्रेरणा व अवयवदानाचे मुल...

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी २.० प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सूरु

यवतमाळ दि.३ :- राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी २.० या नवीन प्रणालीवर शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता सूरु करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. महाडीबीटी २.० पोर्टलद्वारे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना या ऑनलाईनरित्या राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी काय करावे ? सर्व विद्यार्थ्यांसाठी महाआयडी नव्या...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणिकरण करा

> जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन > जिल्हाधिकाऱ्यांची बँक अधिकाऱ्यांसोबत बैठक यवतमाळ दि.३ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दि. ३० जुलै २०२६ रोजी सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली या सभेमध्ये जिल्हा उपनिबंधक, सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे जिल्हा समन्वयक, शाखा व्यवस्थापक, सहाय्यक निबंधक उपस्थित होते. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सर्व बँकांना योजनेच्या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या असुन या यादीत नाव आलेल्या लाभार्थ्यांना तात्काळ आधार प्रमाणिकरण करुन घेण्याबाबत बँक शाखा स्तरावरुन सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्याच्य सूचना दिल्या. याकरीता दवंडी देण्यात यावी. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांना यादी उपलब्ध करुन देऊन या कामी त्यांची मदत घेण्यात यावी. शेतकऱ्यांना दुरध्वनी वरुन संपर्क करावा, बँक शाखेत कर्जमाफीबाबत आलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेविषयी मार्गदशन करावे. बँकेत आलेल्या शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक देण्यात यावी. ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आलेली नाही. त्यांची नावे यानं...

आपत्ती निवारणासाठी प्रशासन अलर्ट ; पूरप्रवण भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Image
> दारव्ह्यातील दहेली येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची तातडीची बैठक > आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांचा घेतला आढावा यवतमाळ, दि. ३१ : दारव्हा तालुक्यातील दहेली येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती वायवस्थापनाच्या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाची तातडीची आढावा बैठक घेत आपत्ती व्यवस्थापनासाठी तत्काळ उपाययोजना करुन सतर्क राहण्याचे तसेच पूरप्रवण भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. दारव्ह्यातील दहेली दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी अनिल खडांगळे, जिल्हा पोलिस अधिक्षक कुमार चिंता, निवासी उप्पजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मुन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच पालकमंत्री संजय राठोड यां...

खरीप हंगाम पीक स्पर्धेत ५ ते ५० हजार रुपयांपर्यंत बक्षीसे शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ दि. 29 : अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात येत आहेत. पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप हंगाम मधील एकूण ११ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर स्पर्धकांची निवड होणार आहे. पिकस्पर्धेतील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल ही खरीप पीके आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या स्वतःच्या शेतावर भात पिकासाठी किमान २० गुंठे तसेच उर्वरित पिकांसाठ...

"कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिंक छळ प्रतिबंधक कायदा विषयी" शिबीर संपन्न

Image
यवतमाळ दि. ३० : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने दि. २८ जुलै रोजी "कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिंक छळ" या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे तर प्रमुख वक्ते म्हणुन अभिषेक मेमोरियल फाउंडेशनच्या सचिव प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार आणि पॅनल वकील सोनाली भोयर यावेळी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार, यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकारने "कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण अधिनियम, २०१३ लागू केला आहे. या कायद्याचा उद्देश प्रत्येक महिलेला कार्यालयात सुरक्षित, सन्मानजनक आणि समतावादी वातावरण मिळवून देणे तसेच लैंगिक छळाच्या घटनांना प्रतिबंध व निवारण करणे आहे. तसेच पॅाश कायद्यानुसार कुठल्याही प्रकारचे अवांछित शारीरिक स्पर्श, लैंगिक स्वरूपाची मागणी किंवा सूचक विनोद, अश्लील दृश्ये, आक्षेपार्ह वर्तन हे लैंगिक छळ म्हणून गणल...

दत्तापुर येथे आदिवासी संस्कृतीचे जतन, सवर्धन व लाभार्थ्याच्या मेळाव्याचे आयोजन क्रांतीवीर शामादादा कोलाम यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ दि.३० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा क्रांतीवीर शामादादा कोलाम संघटना मर्या. यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीवीर आदिवासी जननायक शामादादा कोलाम यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता दत्तापूर (निरंजन माहूर), ता. कळंब, जि यवतमाळ येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे राहणार असून आदिवासी विकासमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्यमंत्री इंद्रनोल नाईक हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमास लोकसभा सदस्य, विधानपरिषद व विधानसभा सदस्य, जिल्हाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी तसेच विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमामध्ये आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेच जतन, लोककला, लोकसंगीत. लोकनृत्य. हस्तकला, खाद्यसंस्कृती. व रानभाजी महोत्सव तसेच स...