शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यास 15 जून अंतीम मुदत

यवतमाळ, दि 7 जून, (जिमाका) :- समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशिप, विद्यावेतन व छत्रपती राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. सदर सर्व योजनांचे काम स्टेट डिबीटी च्या https://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न सन 2021-22 चे परिपुर्ण अर्ज 15 जून 2022 पुर्वी सादर करावयाचे आहे. विद्यार्थी सदर लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयांची राहील, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित