तृतीयपंथीयांसाठी 8 जून ला कार्यशाळेचे आयोजन

 

Ø  ओळखपत्राचे करणार वाटप

यवतमाळ, दि 31 मे, (जिमाका) :- तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण कल्याण मंडळ योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील  तृतीयपंथी यांची दिनांक 8 जून 2022 रोजी जिल्हास्तरीय व 10 जून 2022 रोजी विभागीय स्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे.  या कार्यशाळेमध्ये तृतीय पंथी यांना ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे.

कार्यशाळेला सामाजिक न्याय भवन पळसवाडी कॅम्प दक्षता भवनाच्या मागे दारव्हा रोड यवतमाळ येथे 11 वाजता जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी उपस्थित राहावे तसेच आपले आधार कार्ड ,दोन पासपोर्ट फोटो व स्वं घोषित प्रतिज्ञा पत्र सोबत आणावे असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित