जिल्हा सल्लागार समिती सदस्य पदाकरिता

महिला संघटनांकडून प्रस्ताव आमंत्रित यवतमाळ, दि 7 जून, (जिमाका) :- जिल्ह्यात महिलांच्या संरक्षणासाठी हुंडा निर्मूलन, कौटूंबिक हिंसाचारापासून महिलाचे संरक्षण अधिनियम 2005, देवदासी प्रथा निर्मूलन, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) या सारख्या सामाजिक कायद्याच्या आणि महिला धोरणाच्या प्रभावी अंबलबजावणी करिता जिल्हास्तरावर अधिनियमातील तरतूदीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सल्लागार समिती गठीत करण्यात आलेली आहे. सदर समितीचा कार्यकाल संपुष्टात आला असल्याने नवीन समिती पुनर्गठीत करायची आहे. या समितीमध्ये नवीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करणेकरीता स्थानिक महिला संघटनाचे/संस्थाचे 2 प्रतिनिधी व महिलांच्या कायद्याच्या संदर्भात कार्यरत 5 अशासकीय महिला कार्यकर्ते यांचेकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. उपरोक्त सदस्यांच्या नियुक्तीकरिता परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, दुसरा माळा, प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ येथे 8 दिवसाच्या आत सादर करावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यवतमाळ यांनी आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित