आय. टी. आय. मध्ये प्रवेश सुरु

यवतमाळ, दि 22 जून, (जिमाका) :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,यवतमाळ येथे प्रवेश प्रक्रियेला 17 जून 2022 पासुन सुरुवात झाली आहे. ज्या उमेदवारांना संस्थेत प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी WWW.ADMISSION.DVET.GOV.IN या संकेतस्थळाला भेट देवुन आपला प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचा आहे. प्रवेश अर्ज पुर्ण भरल्यानंतर संस्थेत येवून प्रवेश अर्ज तपासुन, स्विकृत केल्याची पावती घ्यावी. नंतरच आपल्या पसंती क्रमानुसार व्यवसाय निवड करुन घ्यावे. संस्थेत एकूण 19 व्यवसाय असून 32 तुकड्यांमध्ये एकूण 704 उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहे. ही सन 1963 पासुन कार्यरत असून मागील वर्षी संस्थेला महाराष्टातुन प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. अधिक माहितीकरीता संस्थेच्या चौकशी कक्षात किंवा वरील संकेतस्थळावर भेट द्यावी, असे प्राचार्य प्रमोद भंडारे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित