दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्वीक ओळखपत्र देण्यासाठी विशेष मोहीम


 

शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नोंदणी व तपासणीकरिता दिवस निर्धारित

 

यवतमाळ, दि 3 जून, (जिमाका) :- दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्वीक ओळखपत्र (युडीआयडी) देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात येत असून यासाठी श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे ओळखपत्र नोंदणीसाठी व  तज्ञांद्वारे तपासणीकरिता वार व वेळ निर्धारित करुन देण्यात आली आहे.

दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्यांकरिता युडीआयडी  (वैश्वीक ओळखपत्र) मिळण्यासाठी सोमवार व मंगळवार सकाळी 10.00 ते 2.00 वाजेपर्यंत नोंदणी करता येईल तर नविन दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी संबधीत तज्ञांकडून  बुधवार,गुरुवार व शुक्रवार सकाळी 10.00 ते 2.00 वाजेपर्यंत तपासणीची वेळ ठरवून देण्यात आली आहे.

            तरी सर्व दिव्यांग व्यक्तींनी युडीआयडी वैश्वीक ओळखपत्र व दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी निर्धारित दिवशी व वेळी उपस्थित राहून विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी पीयूष चव्हाण यांनी आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित