राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्य 26 जून रोजी धावण्याची स्पर्धा

यवतमाळ, दि 22 जून, (जिमाका) :- राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती निमित्य 26 जून 2022 रोजी जिल्हा प्रशासनातर्फे धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या दिवशी पोस्टल मैदान ते धामणगांव रोड या मार्गावर 3 किलोमिटर, 5 किलोमिटर आणि 10 किलोमिटर पर्यत अंतरासाठी धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून इच्छुक स्पर्धकांनी २६ जून २०२२ रोजी सकाळी ०५.३० वाजता पोस्टल ग्राउडला उपस्थित राहावे. सकाळी ०६.०० वाजता धावण्याच्या स्पर्धेला सुरुवात होईल. धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होणा-या स्पर्धकांनी आपले नाव व मोबाईल नंबरची यादी rdc_yavatmal@rediffmail.com या ई-मेल वर २४ जून २०२२ रोजी पर्यत सादर करावी असे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक अमोल पवार यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती