महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा १५ व १६ नोव्हेंबरला यवतमाळ दौरा
यवतमाळ, दि. 13 (जिमाका): महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य रविवार, १५ नोव्हेंबर व सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
आयोगाच्या दौऱ्यानुसार रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे आगमन, सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ व उपविभागीय अधिकारी, यवतमाळ यांच्या समवेत सुनार बंजारा, मथुरा बंजारा, शिंगाड्या बंजारा, सोनार बंजारा, ढालिया बंजारा, शिंगाड्या बंजारा, व मथुरा बंजारा, मथुरे, या जातीसमुहाच्या अनुषंगाने चर्चा, स.११.३० ते दु. १.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे सभागृह येथे सुनार बंजारा, मथुरा बंजारा, शिंगाड्या बंजारा, सोनार बंजारा, ढालिया बंजारा, शिंगाड्या बंजारा, व मथुरा बंजारा, मथुरे, इ. जाती समुहांचा वि.जा. (अ) प्रवर्गात समावेश करण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगानें समाज प्रतिनिधींशी चर्चा तसेच विमुक्त जाती (अ) प्रवर्गात इतर मागासवर्ग प्रवर्गातील जातींचा समावेश करण्यात येवू नये याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने सुनावणी होणार आहे.
दुपारी शासकीय विश्रामगृह येथे भोजनानंतर दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोगाकडून दारव्हा व दिग्रस तालुक्यांमध्ये क्षेत्रपाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता आयोगाचे पथक शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथून वाशिम येथील शासकीय विश्रामगृहाकडे प्रस्थान करतील.
Comments
Post a Comment