राज्यमंत्री ना. इंद्रनिल नाईक यांच्या हस्ते हुडी खुर्द येथील शेतरस्त्याचे भूमिपूजन

> मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत १८.८३ लाखांच्या कामाचा शुभारंभ यवतमाळ, दि. 13 (जिमाका): राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत पुसद विधानसभा मतदारसंघातील मौजे हुडी खुर्द (ता. पुसद) येथे शेतरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राज्यमंत्री ना. इंद्रनिल नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या योजनेंतर्गत हुडी खुर्द येथील सर्वे क्रमांक २५ ते १० पर्यंतच्या शेतरस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. या रस्त्यासाठी १८ लाख ८३ हजार रुपयांचा निधी मंजूर असून, रस्त्याची एकूण लांबी १ हजार ३०० मीटर आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्या-येण्यासाठी बारमाही रस्त्यांची सुविधा उपलब्ध व्हावी, शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी तसेच शेतीच्या कामांसाठी होणारी गैरसोय दूर व्हावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या रस्त्यामुळे हुडी खुर्द येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीच्या दैनंदिन कामांना गती मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष विजय जाधव, प्रगतशील शेतकरी तथा समिति सदस्य बाबूसिंग आडे, भगवानराव असोले, रणवीर पाटील, नायब तहसीलदार सि.डी.राठोड, उपअधीक्षक भूमिअभिलेख अशोक राठोड, तालुका कृषी अधिकारी व्ही.टि.मुकाडे , जि.प.बांधकाम शाखा अभियंता विनोद चव्हाण व गावचे मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित