सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी मुलांच्या वसतीगृहात सापांबद्दल जनजागृती
यवतमाळ, दि. 1 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. २, पारीजात सोसायटी, वडगाव, यवतमाळ येथे विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व, निबंध व रांगोळी स्पर्धा, आरोग्य शिबिराचे नियोजन तसेच महापुरुषांच्या विचारांतून विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर सभेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी असलेली भीती व गैरसमज दूर करण्यासाठी सर्पजनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्पदंश झाल्यास कोणत्या तातडीच्या उपाययोजना कराव्यात, काय करावे आणि काय करू नये, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस गृहपाल सचिन बोराडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर आद्य क्रांतिकारक महामानव बिरसा मु...