Posts

राज्यमंत्री ना. इंद्रनिल नाईक यांच्या हस्ते हुडी खुर्द येथील शेतरस्त्याचे भूमिपूजन

Image
> मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत १८.८३ लाखांच्या कामाचा शुभारंभ यवतमाळ, दि. 13 (जिमाका): राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत पुसद विधानसभा मतदारसंघातील मौजे हुडी खुर्द (ता. पुसद) येथे शेतरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राज्यमंत्री ना. इंद्रनिल नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या योजनेंतर्गत हुडी खुर्द येथील सर्वे क्रमांक २५ ते १० पर्यंतच्या शेतरस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. या रस्त्यासाठी १८ लाख ८३ हजार रुपयांचा निधी मंजूर असून, रस्त्याची एकूण लांबी १ हजार ३०० मीटर आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्या-येण्यासाठी बारमाही रस्त्यांची सुविधा उपलब्ध व्हावी, शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी तसेच शेतीच्या कामांसाठी होणारी गैरसोय दूर व्हावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या रस्त्यामुळे हुडी खुर्द येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीच्या दैनंदिन कामांना गती मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, जिल्हा...

वसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई होणार

Image
पालकमंत्री ना. संजय राठोड यांचा इशारा; पीडितांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 13 (जिमाका): जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीशी शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकरी, महिला कर्जदारांकडून जोरजबरदस्तीने किंवा दबाव टाकून कर्जाची वसुली करू नये. अशा प्रकारे वसुली करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे गुरुवारी दि.१२ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी काही ठिकाणी शेतकरी, महिला इ. कर्जदारांवर दबाव आणला जात असल्याच्या घटना समोर आल्या. दुष्काळामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या वसुलीचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी शासनाने गंभीर भूमिका घेतली आहे. या विषयावर मुख्यमंत्री यांच्...

‘नशामुक्त युवा’ मॅरेथॉनला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
यवतमाळ, दि. 13 (जिमाका): युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत माय भारत यवतमाळ कार्यालयाच्या वतीने ‘नशामुक्त युवा’ अभियानांतर्गत एक दिवसीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मोठ्या संख्येने युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मॅरेथॉनमध्ये मुलींच्या गटातून उत्कर्षा राऊत हिने प्रथम, सेजल मेश्राम हिने द्वितीय, तर स्नेहल मडावी हिने तृतीय क्रमांक पटकावला. मुलांच्या गटातून यश धुतकर याने प्रथम, महादेव कोरचे याने द्वितीय, तर कुनाल धोपटे याने तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी न्यू योद्धा फिजिकल अकॅडमीचे संचालक करण रणखांबे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसही साजरा करण्यात आला. त्यांच्या कार्याचे स्मरण करून राष्ट्रीय एकता, अखंडता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. युवकांमध्ये नशामुक्तीविषयी जनजागृती करणे, शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देणे आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश देणे हा मॅरेथॉन आयोजनामागील मुख्य उद्देश होता. यावेळी उपस्थित युवक-युवतींनी नशामुक्त भारत...

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मत्स्यपालक, मच्छीमार व नवउद्योजकांना सहाय्यक आयुक्तांचे आवाहन यवतमाळ, दि. 13 (जिमाका): राज्य शासनाने शाश्वत पद्धतीने मत्स्योत्पादनात वाढ करण्यासह विविध उपाययोजनासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय दि. रा. खोपे यांनी केले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शाश्वत पद्धतीने मत्स्योत्पादनात वाढ करणे, मत्स्य उत्पादनाचे मूल्यवर्धन व निर्यातमूल्य वाढविणे, सरासरी उत्पादकता वाढविणे तसेच मासेमारीनंतर होणारे नुकसान कमी करणे, मच्छीमार व मत्स्यपालकांचे उत्पन्न दुप्पट करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील मत्स्यपालक, मच्छीमार तसेच मत्स्यव्यवसाय क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा १५ व १६ नोव्हेंबरला यवतमाळ दौरा

यवतमाळ, दि. 13 (जिमाका): महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य रविवार, १५ नोव्हेंबर व सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. आयोगाच्या दौऱ्यानुसार रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे आगमन, सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ व उपविभागीय अधिकारी, यवतमाळ यांच्या समवेत सुनार बंजारा, मथुरा बंजारा, शिंगाड्या बंजारा, सोनार बंजारा, ढालिया बंजारा, शिंगाड्या बंजारा, व मथुरा बंजारा, मथुरे, या जातीसमुहाच्या अनुषंगाने चर्चा, स.११.३० ते दु. १.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे सभागृह येथे सुनार बंजारा, मथुरा बंजारा, शिंगाड्या बंजारा, सोनार बंजारा, ढालिया बंजारा, शिंगाड्या बंजारा, व मथुरा बंजारा, मथुरे, इ. जाती समुहांचा वि.जा. (अ) प्रवर्गात समावेश करण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगानें समाज प्रतिनिधींशी चर्चा तसेच विमुक्त जाती (अ) प्रवर्गात इतर मागासवर्ग प्रवर्गातील जातींचा समावेश करण्यात येवू नये याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने सुनावणी होणार आहे. दुपारी शासक...

डोळ्यांच्या तिरळेपणावरील उपचारांसाठी यवतमाळात मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

Image
> २० नोव्हेंबरला तपासणी, २१ व २२ नोव्हेंबरला शस्त्रक्रिया > पालकमंत्री संजय राठोड यांची पत्रकार परिषदेत माहिती यवतमाळ, दि. 12 (जिमाका) : तिरळेपणाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लहान मुलांपासून तरुण आणि प्रौढ नागरिकांपर्यंत सर्वांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी यवतमाळ येथे विशेष नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या ‘प्रोजेक्ट नयनतारा’, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि पुणे येथील नेत्रसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर २० ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. या शिबिरांतर्गत २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ओपीडी वेळेत रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांवर २१ व २२ नोव्हेंबर रोजी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून शस्त्रक्रिया करण्यात येईल. शिबिरातील तपासणी आणि शस्त्रक्रिया सीएसआरच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत क...

जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान 'जनजातीय गौरव सेवा सप्ताहा'चे भव्य आयोजन

Image
> क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती > विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार > पालकमंत्री ना. संजय राठोड यांची पत्रकार परिषदेत माहिती यवतमाळ, दि. 12 (जिमाका) : आदिवासी समाजाचे हक्क, जल-जंगल जमीन रक्षण आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान देणारे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या निर्णयानुसार यवतमाळ जिल्ह्यात दिनांक ११ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत 'जनजातीय गौरव सेवा सप्ताह २०२६' अत्यंत उत्साहात आणि लोकसहभागातून साजरा करण्यात येणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती 'जनजातीय गौरव दिन' म्हणून भव्य स्वरूपात साजरी केली जाणार असून या सप्ताहामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत केले. या सप्ताहामध्ये सर्व शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक व कल्याणकारी उपक्रम राबविले जाणार आहेत. सेवा सप्ताहातील प्र...