जिल्ह्याची नजर अंदाज पैसेवारी ४७ पैसे जाहीर
यवतमाळ, दि.30 (जिमाका) : खरीप हंगाम सन २०२६-२७ या वर्षासाठी यवतमाळ जिल्ह्यातील नजर अंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या तालुकानिहाय प्रस्तावांच्या आधारे जिल्ह्यातील एकूण २०५२ लागवडी योग्य गावांची नजर अंदाज पैसेवारी काढण्यात आली आहे. प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यातील एकाही गावाची नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त नाही. २,०५२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असून, यवतमाळ जिल्ह्याची एकूण नजर अंदाज पैसेवारी ४७ पैसे इतकी काढण्यात आली आहे. त्यानुसार यवतमाळ तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या १३५ गावात नजर अंदाज पैसेवारी ४७ पैसे, कळंब तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या १४१ गावात नजर अंदाज पैसेवारी ४७ पैसे, बाभूळगाव तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या १३३ गावात नजर अंदाज पैसेवारी ४८ पैसे, आर्णी तालुक्यातील लागवडी यो...