Posts

शासकीय वसतिगृह न मिळाल्यास स्वाधार योजनेचा लाभ ; विद्यार्थ्याना वसतिगृहासाठी ॲानलाईन अर्ज अनिवार्य

  यवतमाळ दि.७ :अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ११ वी १२ वी त्यापुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये महत्वपुर्ण बदल करण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासुन स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रथम समाज कल्याण विभागातंर्गत येणारे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तेव्हा सन २०२६-२७ मध्ये व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी दि. ७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे अनिवार्य असल्याने यासाठी विभागाच्या संकेस्थळावर   http://hmasnew.mahait.org   अर्ज प्रक्रीया सुरु करण्यात येणार आहे. तसेच नवीन नियमानुसार शासकीय वसतिगृहासाठी अर्ज न करण्याऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह तसेच स्वाधार योजना या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थी गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास संबंधित विद्यार्थी स्वाधार योजनेसाठी पात्र राहणार आहे.   सर्...

मुलांच्या शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू ; ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  यवतमाळ दि.७ : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता १२ वी नंतर व्यावसायिक व अव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासकीय वसतीगृह योजना राबविण्यात येतात. या योजनेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यासाठी वसतीगृह प्रवेश प्रणाली कार्यन्वित करण्यात आलेली आहे. मुलांचे शासकीय वसतिगृह, यवतमाळ येथील व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता विजाभज प्रवर्गाच्या ५, इमाव प्रवर्गाच्या ३, विमाप्र प्रवर्गाच्या २, दिव्यांग प्रवर्गाच्या ३, अनाथ प्रवर्गाची १ व आर्थिक मागास प्रवर्गाच्या ३ अशा एकूण १७ जागा रिक्त आहेत. तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता विजाभज प्रवर्गाच्या ३, इमाव प्रवर्गाच्या ५, विमाप्र प्रवर्गाच्या ०, दिव्यांग प्रवर्गाची १, अनाथ प्रवर्गाची १ व आर्थिक मागास प्रवर्गाची १ अशा एकूण ११ जागा रिक्त आहेत. मुलींचे शासकीय वसतिगृह, यवतमाळ येथील व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता विजाभज प्रवर्गाच्या ७, इमाव प्रवर्गाच्या १०, विमाप्र प्रवर्गाच्या ३, दिव्यांगच्या ३, अनाथची १ व आर्थिक मागास प्रवर्गाची १ अशा एकूण २५ जागा रिक्त आहेत, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरी...

रक्षाबंधनानिमित्त पोस्टाची रात्री उशिरापर्यंत बुकिंग सुविधा

  यवतमाळ दि.७ : येणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित राखी, भेटवस्तू, पार्सल आणि इतर टपाल वस्तूंच्या बुकिंगमध्ये होणारी संभाव्य वाढ लक्षात घेता, नागरिकांच्या सोयीसाठी 'यवतमाळ रेल डाक सेवा सॉर्टिग काउंटर' यवतमाळ मुख्य डाक घर बिल्डींग येथे रात्री उशिरापर्यंत बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रक्षाबंधन सणानिमित्त राखीचे पार्सल वेळेवर रवाना आणि वितरित करता यावेत, यासाठी यवतमाळ रेल डाक सेवा सॉटिंग काउंटर दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. त्यामुळे, ग्राहकांना कार्यालयीन वेळेनंतरही आपले पार्सल सोयीस्करपणे बुक करता येतील. या रात्री उशिरापर्यंतच्या बुकिंग काउंटरवर स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, आंतरराष्ट्रीय टपाल सेवा, आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा इत्यादी टपाल सेवा उपलब्ध असणार आहे. नागरिकांनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा आणि भारतभर तसेच परदेशातील आपल्या प्रियजनांपर्यंत राखी, भेटवस्तू, मिठाई आणि सणासुदीच्या इतर वस्तू वेळेवर पोहोचवण्यासाठी त्या आधीच बुक कराव्यात, असे आवाहन रेल डाक सेवा नागपूरचे अधीक्षक गणेश अंभोरे यांनी केले आहे. वितरण प्रक्रिया सुरळीत आणि वेळेवर होण्यासाठी, ग्राहक...

’मेरा रेशम, मेरा अभिमान 2.0’ अंतर्गत कार्यशाळा ; शेतकऱ्यांना तुती लागवड करण्याचे आवाहन > भरगोस उत्पन्न वाढविण्याची संधी

Image
  यवतमाळ दि.७ : ‘मेरा रेशम मेरा अभिमान 2.0’ स्टेकहोल्डर अंतर्गत तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, यवतमाळ येथे सोमवारी दि. ३ ऑगस्ट रोजी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीकरीता मोठ्या प्रमाणात वाव असून जिल्ह्यातील नैसर्गिक परिस्थीतीवर मात करुन शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी रेशीम शेती प्रमुख पर्याय ठरु शकतो. पारंपारिक पिकांसोबतच कमी खर्चात आर्थिक उत्पादन देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांनी वळावे, यासाठी रेशीम शेतीला प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालयाने केले आहे. रेशीम शेती वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा उत्पन्न मिळवून देणारी व कमी खर्चाची असल्याने याकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी शासनाकडून विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अर्थात व्हीबी जीरामजी) व सिल्क समग्र-2 या योजनांमधून अनुदान दिल्या जाते. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे किमान एक एकर जमीन तसेच बारमाही सिंचनाची सोय उपलब्ध असावी. रेशीम कोषाला आजच्या तारखेला बीड मार्केट मध्ये 835 रुपये प्रती किलो असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्...

जिल्ह्यातील 43,647 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे 374 कोटी रुपये जमा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभ वितरित

Image
> पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना  > मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभ वितरित  > पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती > शेतकऱ्यांना मोठा दिलासा यवतमाळ, दि. 7 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास सुरुवात झाली असून, योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 5,029 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या लाभाचे वितरण करण्यात आले. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 43,647 शेतकऱ्यांच्या खात्यात 374 कोटी 31 लाख 43 हजार 481 रुपयांचा लाभ थेट जमा करण्यात आला आहे.  शेतकरी कर्जमुक्ती योजनेसंदर्भात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देताना येणाऱ्या अडचणी, प्रलंबित प्रकरणे तसेच पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, क...

आदिवासी कोलाम समाजाच्या विकासासाठी अनेक मागण्या मार्गी ; पालकमंत्री संजय राठोड यांनी चार तास घेतली आढावा बैठक > अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

यवतमाळ, दि. ६ : जिल्ह्यातील आदिवासी कोलाम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या मार्गी लावल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल चार तास आढावा बैठक घेतली. बैठकीत कोलाम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि प्रशासकीय प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कोलाम समाजासाठी ग्रामसाथी नियुक्त करून त्यासाठी जिल्हा नियोजन आराखड्यातून निधी उपलब्ध करून देणे, महिला सक्षमीकरणासाठी बचत गट स्थापन करून स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत करणे, शबरी महामंडळाच्या अल्पदल कर्ज योजनेत कोलाम समाजाला २५ टक्के प्राधान्य देणे, आश्रमशाळांतील शिक्षणाचा दर्जा उंचावणे, वनहक्क दाव्यांबाबत मंत्रिमंडळात प्रस्ताव सादर करणे, सीएफआर क्षेत्रात फळबाग लागवड करणे, सीमांकन प्रक्रिया पूर्ण करणे आणि सीएफआर समित्या सक्षम करण्याचे निर्णय घेण्यात आले. याशिवाय, कुळ कायद्यातील जमिनी भोगवटा-१ मध्ये रूपांतरित करण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, 'जिवंत सातबारा' मोहिमेंतर्गत...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन

Image
मुंबई/ यवतमाळ दि.5 : आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्रशांत इंगळे यांच्यासाठी २ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टाटा ट्रस्टकडून १९ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक मदतही उपलब्ध झाली. त्यामुळे एकूण २१ लाख ६० हजार रुपयांचा निधी उभारला गेला आणि अत्यंत खर्चिक असलेले यकृत प्रत्यारोपण शक्य झाले. प्रशांत इंगळे हे अकोला येथे केबल टाकण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात ...