२८ नोव्हेंबरला नवोदय विद्यालयाची निवड चाचणी परीक्षा
यवतमाळ, दि. २७ : जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा येथील इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी निवड चाचणी २०२७ ही शनिवारी, २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही चाचणी सीबीएसई नवी दिल्लीतर्फे घेण्यात येत आहे.
या परिक्षेसाठी ४५ परीक्षा केंद्र राहणार असून जिल्ह्यातील १२५६६ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली आहे. इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वाची असून, पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी. परीक्षेला उपस्थित राहताना सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
000
Comments
Post a Comment