विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ २८ व २९ नोव्हेंबरला सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबीर

यवतमाळ, दि.२७ : भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरीत, मृत, दुबार (एएसडीडी) मतदारांसाठी गणना प्रपत्र उपलब्ध करून देण्यात आले असून, गणना प्रपत्रे वितरण व संकलनाची कार्यवाही १८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत सुरू आहे. संबंधित मतदारांना आपली नोंदणी व गणना प्रपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सोयीस्कर व्हावी, यासाठी शनिवार दि. २८ नोव्हेंबर २०२६ व रविवार दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. नागरिकांनी, विशेषतः अनुपस्थित, स्थलांतरीत, मृत, दुबार (एएसडीडी) श्रेणीतील मतदारांनी, संबंधित मतदान केंद्रावर जाऊन दि. २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असा आहे कार्यक्रम : गणना प्रपत्रे वितरण व संकलन कालावधीः १८ नोव्हेंबर २०२६ ते १० डिसेंबर २०२६ गणना प्रपत्रे (EFs) निकाली काढण्याची तारीखः ३० नोव्हेंबर २०२६ विशेष नोंदणी शिबिरांचे दिवसः शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ व रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ (सर्व मतदान केंद्रांवर) दावे व हरकती निकाली काढण्याची तारीखः १५ डिसेंबर २०२६

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित