Posts

अवैध रेती उत्खननप्रकरणी 2.44 लाखांचा दंड वसूल

v सात प्रकरणात गुन्हा दाखल       यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यातील रेती घाटावरून अवैधरित्या रेती उत्खनन करणा-यांविरुध्द जिल्हा प्रशासनाच्यावतीने कडक कारवाई करण्यात येत आहे. 29 एप्रिलच्या रात्री महसूल विभागाने केलेल्या विशेष मोहिमेदरम्यान 2 लक्ष 44 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.             महसूल विभागाने विशेष मोहिमेदरम्यान अवैध रेती वाहतुकीचे एकूण 12 प्रकरणे शोधून काढली. यात दिग्रस तालुक्यात दोन प्रकरणे, पुसद तालुक्यात दोन, उमरखेड तालुक्यात तीन, महागाव तालुक्यात एक, घाटंजी तालुक्यात तीन आणि वणी तालुक्यातील एका प्रकरणाचा समावेश आहे.   त्यापैकी पुसद येथील एका प्रकरणात 2 लक्ष 44 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला. तर दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील सात प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ०००००००

प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नका

v जिल्हाधिकारी यांचे आवाहन यवतमाळ, दि. 30 : स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक व महाराष्ट्र दिन राज्यभर साजरा करण्यात येतो. यावेळी राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान व्हावा, हे प्रत्येक सुजान नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे 1 मे महाराष्ट्र दिनी प्लास्टिक ध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, फाटलेले, रस्त्यांवर पडलेले, माती लागलेले राष्ट्रध्वज सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी इतरत्र पडलेले आढळतात. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सुजान व जागरूक नागरिक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, तालुका माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या मदतीने अशाप्रकारे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी. तसेच विक्रेत्यांनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची वि...

राष्ट्रसंतांनी दाखविलेल्या मार्गानुसार कर्तव्य पार पाडा – जिल्हाधिकारी

Image
v जिल्हाधिकारी कार्यालयात तुकडोजी महाराज जयंती       यवतमाळ, दि. 30 : संत तुकडोजी महाराज यांचा जन्म विदर्भात झाला असला तरी देशाचे राष्ट्रसंत होते. त्यांनी संपूर्ण देशाला ग्रामीण प्रशासनाचे धडे दिले. स्वच्छता, शिक्षण आदी विषयांबाबत त्यांच्या संदेशाचे महत्व आजही कायम आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रसंतांनी दाखविलेल्या मार्गानुसार कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.             जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी.   भराडी, तहसीलदार शैलेश काळे आदी उपस्थित होते.             राष्ट्रसंतांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावल येथे झाला, असे सांगून जिल्हाधिका...

33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेकरीता सर्वांचा समन्वय आवश्यक – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक यवतमाळ, दि. 23 : दिवसेंदिवस कमी होणा-या वनांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यवतमाळकरांना तर याची चांगलीच जाणीव आहे. वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य शासनाने यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. मात्र हे केवळ एकट्या वनविभागाचे काम नाही. तर या मोहिमेच्या यशस्वीकरीता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. 2019 मधील 33 कोटी वृक्षारोपन कार्यमक्रमाचे नियोजन व पुर्वतयारीबाबत सर्व विभागांच्या समन्वय अधिका-याची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी जि.प.मुख्याधिकारी जलजकुमार शर्मा, मुख्यवनसंरक्षक पी.जी.राहूरकर, उपवनसंरक्षक बि.एन. पिंगळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनिल महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार व-हाडे व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय विभागनिहाय वृक्ष लागवडीचे उदिष्ट, नियोजनाचा आढावा घेतला. ते म्हणाले उदिष्टांच्या पुर्ततेच्या दृष्टिकोनातुन विभागांनी आपल्या अधिनस्त कार्यालयाच्या...

बोंडअळी नियंत्रणासाठी सुरवातीपासूनच काळजी घ्या - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Image
यवतमाळ, दि. 18 : शेतीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जाणारा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. या हंगामात योग्य नियोजन करण्याच्या सुचना जिल्ह्यातील कृषी यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. बोंडअळी नियंत्रणात जिनिंग प्रेसिंगचीसुध्दा महत्वाची भुमिका आहे. त्यामुळे जिनिंग प्रेसींग व्यवस्थापनानेसुध्दा याबाबत सुरवातीपासूनच काळजी घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार, उपसंचालक रवींद्र पाटील, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात जवळपास चार लक्ष हेक्टरवर कपाशीची लागवड होणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, बोंडअळी नियंत्रणासाठी सुरवातीपासूनच फेरोमन ट्रॅप लावणे गरजेचे आहे. यासाठी सर्व जिनिंग प्रेसींग व्यवस्थापनाने कामाला लागावे. फेरोमन ट्रॅप लावल्यानंतर त्यातील कॅप्सुल नियमित बदलविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने योग्य नियोजन करा. पुढील आठवड्यापासून जिनींग प्रेसींगच्या तपासणीला सुरवात करावी. फेरोमन ट्रॅप हा विषय अत्यंत जि...

निवडणूक खर्च व अनियमिततेच्या अनुषंगाने तीन गुन्हे दाखल

यवतमाळ, दि. 15 : यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघामध्ये निवडणूक खर्च तसेच अनुषंगीक बाबींमधील अनियमिततेच्या अनुषंगाने तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवसेना उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ लेखी परवानगीशिवाय एकनाथ पंजाब तुमकर व अर्चना अरुण खंडाळकर यांनी सभेकरीता आलेल्या लोकांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी खिचडीचे वाटप केल्याने यवतमाळ शहर पोलिस स्टेशन येथे येथे कलम 171 एच, 188 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा गुन्हा पुसद (शहर) पोलिस स्टेशन येथे भावना गवळी व रवी पांडे यांचे विरुध्द भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 171- एच, 188 नुसार नोंदविण्यात आला आहे. शिवसेना पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या निवडणुकीला चालना देण्याकरीता मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या वाहनात इंधन टाकून देण्याचे प्रलोभन दिल्याचे निदर्शनास आले आहे. आदर्श आचारसंहितेचे हे उल्लंघन असल्यामुळे गुन्हा   नोंदविण्यात आला आहे.   तिसरा गुन्हा दारव्हा पोलिस स्टेशन येथे कृषी पर्यवेक्षक प्रकाश अभिमान उघडे व कृषी सहाय्यक राजेश प्रेमसिंग राठोड यांचे विरुध्द नोंदविण्यात आला आहे. त्यांनी संबंध...

14 - यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघ सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे 54.69 टक्के मतदान

Image
v अंतिम आकडेवारी उशीरापर्यंत मिळणार यवतमाळ, दि. 11 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 च्या पहिल्या टप्प्यात 14- यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघाकरीता मतदान झाले. सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे 54.69 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या अंतिम टक्केवारीमध्ये हा आकडा वाढणार आहे. यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघात 34-वाशिम, 35-कारंजा, 77-राळेगाव, 78-यवतमाळ, 79-दिग्रस आणि 81- पुसद या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या लोकसभा मतदारसंघात एकूण 19 लक्ष 14 हजार 805 मतदार आहेत. मतदानाच्या दिवशी (11 एप्रिल) सकाळी 7 वाजता मतदानाला सुरवात झाली. सुरवातीला सकाळी 7 ते 9 या वेळेत 5.03 टक्के मतदान झाले. मतदानाचा हा आकडा वाढत गेला आणि सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत अंदाजे 54.69 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शहरातील दादासाहेब मांडले विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेचे व्यवस्थापन महिलांच्या हाती होते. सकाळी या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांचे स्वागत गुलाब पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल...