Posts

पीएम किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध होणार

Image
        यवतमाळ दि.12 : जिल्ह्यातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत सर्व बँकांनी विशेष मोहीम राबवावी, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बँकर्सच्या बैठकीत दिल्या.             जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपनिबंधक सहकारी संस्था अर्चना माळवे, अग्रणी बँकेचे सहाय्यक प्रबंधक सचिन नारायणे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील पी.एम. किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध करून देणे, असा या मोहिमेचा उद्देश असून त्याचा कालावधी दिनांक 8 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2020 असा राहणार आहे, असे यावेळी जिल्हाधिका-यांनी सांगितले. किसान क्रेडीट कार्ड मोहिमेची उद्दिष्टे : ज्या पी.एम. किसान लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडीट कार्ड नाही, अशा शेतक-यांच्या जमिनीची कागदपत्रे बघून त्यांना नवीन किसान क्रेडीट कार्ड बँकेमार्फत द्यायचे आहे. ज्या लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडीट कार्ड आहे, त...

पांदण रस्त्यांसाठी 22.50 कोटी जिल्हा परिषदेकडे वर्ग

Image
v वेळेत निधी खर्च करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश यवतमाळ दि.12 : गावखेड्यांच्या दृष्टीने पालकमंत्री पांदण रस्ता योजना अतिशय महत्वाची आहे. या योजनेशी संबंधित सर्व मान्यता स्थानिक स्तरावरच देण्याची तरतूद असल्यामुळे 22.50 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. हा निधी वेळेत खर्च करण्याच्या सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. सन 2018-19 या वर्षातील पालकमंत्री पांदण रस्ते योजनेअंतर्गत 22.50 कोटींचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला असून खर्चाची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत आहे. याबाबतची कामनिहाय माहिती सादर करून खर्चाचे नियोजन करावे. गावागावातील इंग्रजकालीन पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन कामे त्वरीत करून घ्यावीत. अ, ब आणि क अशी वर्गवारी असलेली पांदण रस्त्यांची सर्व कामे वेळेत पूर्ण करा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. सन 2019-20 वर्षाकरीता प्राथमिक शाळांच्या इमारत बांधकामासाठी तीन कोटी रुपये मंजूर तरतूद करण्यात आली होती. पुनर्विनि...

जिल्ह्यातील 98 हजार खातेदारांचा डाटा अपलोड

Image
v   महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यवतमाळ दि. 11 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 98 हजार खातेदारांचा डाटा आतापर्यंत अपलोड करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँकर्सची आढावा बैठक घेतली. यवतमाळ जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेकरीता पात्र बँक खात्यांची संख्या 1 लक्ष 10 हजार 947 आहे. यापैकी दि. 11 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व बँका व त्यांच्या शाखांमार्फत एकूण 98 हजार 74 खातेदारांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. यात सर्वाधिक 25555 खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 19074 खातेदार, युनियन बँक ऑफ इंडियाचे 12898 खातेदार, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 12819, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे 9861 खातेदार तसेच इतर बँकांचा समावेश आहे. खातेदारांचा डाटा अपलोड करतांना बँकांना काही अडचणी आहेत का, असे विचारून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व माहिती अपलोड करावयाची आहे....

सिंचनासाठी लोकसंख्येच्या आधारावर विहिरींची संख्या वाढवा - पालकमंत्री संजय राठोड

Image
यवतमाळ दि. 10 : जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारीत आहे. येथे सिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र कमी असल्यामुळे शेतक-यांना दुबार-तिबार उत्पादन घेता येत नाही. यावर मात करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत सिंचन विहिरींची संख्या वाढविण्याचे निर्देश राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. नियोजन समितीमध्ये कृषी विभागाचा आढावा घेतांना ते बोलत होते. सद्यास्थितीत प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत नरेगातून पाच विहिरींना मान्यता देण्यात येते. मात्र हे प्रमाण अत्यल्प आहे. सिंचनाचे क्षेत्र वाढवायचे असेल तर विहिरींची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे मोठ्या ग्रामपंचायतीमधील लोकसंख्येच्या आधारावर किमान 20 ते 25 सिंचन विहिरी आणि गटग्रामपंचातीमध्ये किमान 12 ते 15 विहिरी देण्यात याव्या. याबाबत नियोजन समितीच्या बैठकीचा संदर्भ देऊन तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या. ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान : जनसुविध...

जिल्ह्याच्या विकासासाठी 237 कोटींची तरतूद

Image
v पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची  बैठक यवतमाळ दि. 9 : विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे प्रलंबित असलेली यवतमाळ जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आगामी 2020-21 या वर्षाकरीता कमाल आर्थिक मर्यादेनुसार जिल्ह्याच्या विकासासाठी 237.78 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नियोजन समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री ख्वाजा बेग, डॉ. वजाहत मिर्झा, दुष्यंत चतुर्वेदी, निलय नाईक, इंद्रनिल नाईक, मदन येरावार, डॉ. अशोक उईके, डॉ. संदीप धुर्वे, संजीवरेड्डी बोदकुरवार, नामदेव ससाणे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अपर पोलिस अधिक्षक नुरुल हसन, विदर्भ वैधानिक महामंडळाचे किरण मोघे, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त किशोर भोयर आदी उपस्थित होते. शेतक-यांना दुष्काळी मदतीचा प्रस्ताव ठरावाद्वारे एकमुखाने मंजूर करून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, जिल्ह्यात वैद्यकीय अधिका-यांच्य...

शिवभोजन थाळीची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री संजय राठोड

Image
v शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुभारंभ यवतमाळ दि.08 : गरीब व गरजू लोकांना अत्यल्प दरात स्वादिष्ट जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाने शिवभोजन योजना सुरू केली आहे. सुरवातीला प्रायोगिक तत्वावर तीन ठिकाणी हे भोजन नागरिकांना उपलब्ध होणार आहे. मात्र जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर शिवभोजन थाळीची व्याप्ती वाढावी, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन वने, भुकंप पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री दुष्यंत चतुर्वेदी, इंद्रणील नाईक, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडी, सभापती विजय राठोड, राजेंद्र गायकवाड, शिल्पा देशमुख, श्रीधर मोहड, लता चंदेल, थाळी केंद्राचे संचालक विकास क्षीरसागर आदी उपस्थित होते. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतांनाच शेतक-यांसाठी महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना व गरीब आणि गरजू व्यक्तिंच्या ...

शिक्षणातूनच होणार भटक्या समाजाचा विकास - विजय वडेट्टीवार

Image
• घरकुलाचा प्रश्न लवकरच सोडवणार यवतमाळ दि.8 : भटक्या समाजाकरीता घरकुलाचा प्रश्न प्राधाण्याने सोडविणार येईल. मात्र समाजाचा विकास हा फक्त घरे बांधून होत नाही, त्यासाठी मुलांना योग्य शिक्षण  व चांगले संस्कार देणेही गरजेचे आहे. भटक्या जमातीच्या मुलांना आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर नामांकित इंग्रजी शाळेतून शिक्षण देण्यासाठी राखीव जागेची तरतूद करण्यात येईल. तसेच शिक्षित मुलांना कौशल्य विकासच्या माध्यमातून रोजगाराभिमुख प्रशिक्षण योजना राबविणार असल्याचे प्रतिपादन इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. यवतमाळ जिल्ह्यातील भंडारी (नाथ) या नाथजोगी वस्तीत व भांब (राजा) या वडार वस्तीत त्यांनी भेट देवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, सहसचिव श्री गावीत, उपायुक्त विजय साळवे, तहसिलदार धीरज स्थुल, अनिल आडे, देवानंद पवार, जितेंद्र मोघे, राहुल ठाकरे,  सरपंच च...