जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 34 वर
v आज तपासणीसाठी पाठविले 163 नमुने यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत पॉझेटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 14 वरून शनिवारी एकदम 34 वर पोहचल्याने चिंतेत भर पडली आहे. दि. 25 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार एकूण 20 रुग्णांचे नमुने पॉझेटिव्ह आले. त्यामुळे आयसोलेशन वॉर्डमध्ये सद्यस्थितीत एकूण 34 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण भरती असून त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेले रुग्ण हे पूर्वी भरती असलेल्या पॉझेटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कात आले होते. तसेच त्यांच्या तीन कुटुंबातील सदस्यांचा यात समावेश आहे. गत काही दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या या रुग्णांचा रिपोर्ट शनिवारी महाविद्यालयाला प्राप्त झाला. आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत एकूण 261 नागरिक भरती असून शनिवारी सकाळी 163 नमुने तपासणीकरीता नागपूरला पाठविले आहे. आज दिवसभरात एकूण 12 रुग्ण भरती झाले आहेत. गत 24 तासात एकूण 38 रिपोर्ट प्राप्त झाल्या असून यापैकी एकूण 20 पॉझेटिव्ह, 14 निगेटिव्ह तर चार जणांचे रिपोर्ट तपासणीकरीता पुन्हा पाठ...