जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे 9 डिसेंबरला आयोजन
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व जिल्हा वकील संघ, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे तसेच यवतमाळ जिल्हयातील सर्व तालुका न्यायालये, कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तकार निवारण मंच आणि इतर सर्व न्यायालये तसेच न्यायाधिकरणे येथे 9 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस.व्ही. हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भुअर्जन मामल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद प्रकरणे, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघणार आहे. या लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याक...