Posts

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पूरबाधित 82 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 58 कोटी जमा

 डिबीटीद्वारे मदत वितरित; ई-पंचनामा पोर्टलचा वापर  शेतकऱ्यांनी बॅंक खाते ई-केवायसी करण्याचे आवाहन यवतमाळ, दि.14 : गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झाले. यातील बाधित 82 हजार 698 शेतकऱ्यांच्या खात्यात डिबीटी पद्धतीद्वारे 58 कोटी 53 लाख 11 हजार इतका निधी जमा करण्यात आला आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची मदत बाधित शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध व्हावी याकरिता शासनस्तरावरून ई-पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे 2023 मधील अवकाळी पाऊस, मान्सून ऑक्टोबर 2021, सप्टेंबर, ऑक्टोबर 2022, जुन- जुलै 2023 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांची नुकसानीची मदत बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी याकरिता ई-पंचनामा पोर्टलवर तालुकास्तरावरून आतापर्यंत 1 लाख 76 हजार 201 बाधित शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली असून जिल्हास्तरावरून नोंदी मान्य करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत शासन स्तरावरून डिबीटी पद्धतीद्वारे 82 हजार 698 बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात 58 कोटी 53 लाख 11 हजार 141 रुपये इतका निधी ज...

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जिल्हा दौरा

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले शनिवार दि.१३ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौरावर येत असून त्यांचा दौरा खालील प्रमाणे आहे. दुपारी ३.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे समाज कल्याण अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतील. सायंकाळी ४.४५ वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतील. सायंकाळी ५.२० वाजता स्थानिक भेटी. त्यांनतर नेर तालुक्यातील सहारा नगर येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर औरंगाबाद कडे प्रयाण करतील.

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

Image
स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कृषि महोत्सवात पौष्टिक तृणधान्य पाककला व रांगोळी स्पर्धा महिलांनी मोठ्यासंख्येत सहभागी होण्याचे आवाहन

जिल्हा कृषि महोत्सव व प्रदर्शनीचे दि. 14 ते 18 जानेवारी दरम्यान यवतमाळातील समता मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दि. 14 जानेवारी रोजी दुपारी 1.00 वाजता होणार असून उ‌द्घाटन कार्यक्रम मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. हा कार्यक्रम लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या महोत्सवात दि. 15 व 16 जानेवारी रोजी पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा व दि. 17 जानेवारी रोजी तृणधान्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत महिला आणि इच्छुकांनी मोठ्यासंख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पाककला स्पर्धा : पौष्टिक तृणधान्य विषयावर आधारित पाककला स्पर्धा ही 15 व 16 जानेवारी रोजी दुपारी 4.30 ते 5.30 यावेळेत यवतमाळमधील समता मैदान अर्थात पोस्टल ग्राऊंड येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश नोंदणी ही 13 जानेवारीपर्यंत करावी लागणार आहे. या स्पर्धेसाठी सिमा संजय अवझाडे यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ही पाककला स्पर्धा महिलांसाठी खुल्या गटाकरिता आहे. या स्पर्धेत एक दिवस अगोदर सहभा...

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पूणे यांचे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या वतीने दि. 12 जानेवारी रोजी वंदनीय स्वामी विवेकानंद यांची जंयती (राष्ट्रीय युवा दिन) म्हणून जिल्हा क्रीडा संकुल गोधणी रोड, यवतमाळ येथे साजरा करण्यात आला. सर्वप्रथम स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतीमेस पुष्पमाला अपर्ण करून जिल्हा क्रीडा अधिकारी श्री घनश्याम राठोड यांची दोन्ही महान विभुतीचे माहात्मय सर्वांना सांगीतले व त्यांच्या आदर्शावर चालण्याचा सर्वांना सल्ला दिला. या कार्यक्रमास कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थीत होते. तसेच कार्यालयात आलेले अभ्यागत व खेळाडू उपस्थित होते.

बाभूळगाव येथील रोजगार मेळाव्यात 190 उमेदवारांची प्राथमिक निवड

Image
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभुळगावच्या संयुक्त विद्यमाने आ.डॉ. अशोक उईके यांच्या मतदारसंघातील बाभूळगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी 190 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. मेळाव्यामध्ये एकूण 11 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. कंपन्यांकडील 2 हजार 193 रिक्त पदे अधिसूचित करून मुलाखतीकरीता कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी मेळाव्यास उपस्थित होते. रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी आ.डॉ.अशोक उईके यांनी उपस्थित उमेदवारांना मोलाचे मार्गदर्शन केले. उमेदवांनी मुलाखती देऊन रोजगाराच्या संधी प्राप्त करून घेण्याकरिता शुभेच्छा दिल्या. सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी मेळाव्याचा लाभ घेऊन मुलाखती देण्याकरिता विद्यार्थ्यांना आवाहन केले. या मेळाव्याचा एकूण 300 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला तर एकूण 190 विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली. प्रत्यक्ष त्या ठिकाणीच कंपनीच्या अधिकाऱ्यांद्वारे एकूण 17 विद्या...

सर्व खाजगी, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांना ईआर प्रपत्र सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पूरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा ऑनलाईन मिळणार असून त्यासाठी rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक किंवा आस्थापनांनी सेवायोजन कायद्यान्वये त्रैमासिक रोजगार परतावा (ईआर 1) ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर अखेर संपणाऱ्या त्रैमासिकासाठी ईआर 1 या प्रपत्राची माहिती रोजगार महास्वयम या संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकिय, खाजगी उद्योजक किंवा आस्थापना यांनी त्यांचे युझर आय डी व पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करून ऑनलाईन सादर करावे व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावे. ऑनलाईन ईआर 1 सादर करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा दूरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४३९५ यावर संपर्क साधावा. ईआर 1 प्रपत्र सादर करण्याची अंतिम मुदत जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत आहे. ईआर 1 ऑनलाईन सादर न करणाऱ्या कसूरदार आस्थापनावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणा...