Posts

अमरावती येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय व विद्यार्थी विकास विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस या नामांकित कंपनी करीता रोजगार मेळाव्याचे आयोजन दि.१९ मार्च रोजी विद्यापिठाच्या डॉ.ङी.के.देशमुख सभागृह येथे करण्यात आले आहे. या मेळाव्याकरीता अमरावती विभागातील किमान २०० पदवीधर, पदवी परिक्षेच्या अंतीम वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यामधे सहभाग घेण्याकरिता इच्छुक पदवीधर उमेदवारांनी https://forms.gle/३zvnHwm८ TRU९uB१N९ या लिंक वर क्लिक करून आपली नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उपआयुक्त द.ल. ठाकरे आणि सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे. शैक्षणिक पात्रता, निवड पध्दती, सोबत आणावयाचे दस्तऐवज याबाबतची माहिती वरील गुगल लिंकमध्ये देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी गुगल फार्म भरून प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे. 000

तणावातही पोलिस अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावतात - पालकमंत्री संजय राठोड

Image
पोलिस विभाग अत्यंत महत्वाचा विभाग आहे. समाजात शांतता, अलोखा राखण्याचे काम या विभागातील अधिकारी, कर्मचारी करत असतात. अलिकडे पोलिस विभागाचे काम प्रचंड वाढले आहे. कर्मचाऱ्यांची देखील कमतरता आहे, असे असतांना देखील प्रामाणितपणे कर्तव्य बजावले जातात, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. जिल्हा पोलिस दलाच्यावतीने येथील कवायत मैदान येथे बांधण्यात आलेल्या आरोग्यम् पोलिस हेल्थ क्लबचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पियुष जगताप, कार्यकारी अभियंता दादासाहेब मुकडे आदी उपस्थित होते. अलिकडे मोबाईल, इंटरनेटमुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. अशा गुन्हेगारीवर आळा घालने फार मोठे आवाहन आहे. आमचा पोलिस विभाग समर्थपणे या आवाहनाचा सामना करत आहे. पुर्वी पोलिसांकडे ठराविक कामे होती. अलिकडे पोलिस विभागाचे कार्यक्षेत्र देखील वाढले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच सामाजिक पोलिसिंग करावी लागते. ...

जिल्ह्यातील तीन महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

राज्यामधील महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक-युवतींना व्हावा या दृष्टीकोनातून महाविद्यालयामध्ये महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील तीन केंद्राचा समावेश असून या केंद्राचे उद्गाटन नुकतेच झाले. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ, रामदास आठवले आर्ट सायन्स ज्युनिअर महाविद्यालय चिकणी (डो) ता.नेर, श्री. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मारेगाव या महाविद्यालयामध्ये महाविद्यालय कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी उद्घाटन कार्यक्रमास कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनप्रसंगी या योजनेचे नाव चाणक्य कौशल्य विकास केंद्र असे घोषित केले. देशाला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊन आर्थिक प्रगती मध्ये देश हा उच्च स्तरावर पोहचवण्याचे कार्य या विभागामार्फत होत आहे. युवकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. ज...

कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन

वसंतराव नाईक कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.शिल्पा पोलमेल्लीवार, उपशिक्षणाधिकारी प्रा.अंजली गहरवाल, प्रा.धिरज वसुले व डॉ. प्रशांत शिंगोटे उपस्थित होते. डॉ.शिल्पा पोलपेल्लीवार यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी समाजात जगत असतांना स्वत:ची क्षमता ओळखून जागरूक व सक्षम असले पाहिजे. स्वत:मधील चांगल्या विचारांचा विकास करून व वाईट विचार काढून स्त्रीयांचे तेज उसळत असते. जीवनात पुढे जात असतांना चिकित्सक व संशोधनात्मक दृष्टीकोन बाळगल्यास स्वत:चे कौशल्य विकसित करून कुटुंबासाठी व समाजात जगता येते, असे सांगितले. डॉ. पार्लावार म्हणाले की, न्यूयार्क येथे महिलांनी कामाच्या जागी सुरक्षितता, दहा तासांचे काम व मतदानाचा हक्क या मागण्या केल्या होत्या. स्त्रीयांचा सन्मान, कर्तृत्व, सशक्तीकरण आत्मनिर्भर व सामाजिक समानतेचे महत्व पटवून देण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांना अमानवी पद्धतीने वागविणाऱ्या समाज व्...

देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या शुरविरांचे स्मरण करणे प्रत्येकाचे कर्तव्य - पालकमंत्री संजय राठोड

Image
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या शुरविरांमुळे हा महोत्सव साजरा करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. अजूनही आपले शुर सैनिक देशाच्या सिमेवर देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्रपणे काम करत असतात. प्रसंगी आपले प्राण देखील गमावतात. अशा सर्व विरांचे स्मरण करणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार व कृतज्ञता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, प्रकाश देशपांडे, रुपाली बेहरे, तहसिलदार निकेता जावरकर उपस्थित होते. स्वातंत्र्य लढ्यात अनेक शुर विर सहभागी झाले होते. आपल्या प्राणांची पर्वा न करता मातृभूमिच्या रक्षणासाठी या विरांनी शेवटच्या श्वासापर्यंत परकीय सत्तेशी लढा दिला. अजूनही देशाच्या सिमा सुरक्षित ठेवण्यासाठी देशाचा प्रत्येक सैनिक आपले कर्तव्य प्राणपणाने बजावत असल्या...

आज जागतिक ग्राहक दिन व प्रदर्शनीचे आयोजन

दरवर्षी दि.१५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त ग्राहकांचे प्रबोधन व्हावे या दृष्टीकोनातून उद्या दि.१५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ग्राहक दिन व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम अन्न व औषध प्रशासन विभाग, वैधमापन शास्त्र विभाग, एस.टी. महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारत संचार निगम लिमिटेड, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, गॅस एजन्सीज, पेट्रोल पंप व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त गोपाल मोहोरे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष डॉ.नारायणराव मेहरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजेंद्र निमोदीया, अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ आडे हे उपस्थित राहणार आहेत. पोलिस विभागाकडून सायबर क्राईम अंतर्ग...

राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणाली अँपचे प्रशिक्षण

भारत सरकारच्या कृषि आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या क्षेत्रीय केंद्रीय एकात्मिक किड व्यवस्थापन केंद्र नागपुरच्यावतीने जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून आलेल्या प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणाली या अँपचे प्रशिक्षण जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी अनिल राठी आणि कृषी विज्ञान केंद्र यवतमाळचे वैज्ञानिक डॉ.प्रमोद मगर यांनी कार्यक्रमात सहभागी राहुन मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील 20 प्रगतिशील शेतकऱ्यांनी भाग घेतला. भारत सरकारच्या कीटकशास्त्र सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी छाया पासी, वनस्पती रोग विज्ञानचे सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी स्वाती भुंबर तथा वैज्ञानिक सहाय्यक आश्मिना धाडसे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना या अँपबद्दल माहिती दिली. या अँपमुळे शेतकऱ्यांना सहज पध्दतीने किडीची ओळख कसे करायची आणि अँपमध्ये डेटा फिडिंग करून तेव्हाच्या तेव्हा विभागाच्या सल्ल्याचा फायदा कसा घ्यायचा हे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. त्याच बरोबर एकात्मिक किड व्यवस्थापन, मित्र ...