Posts

Image
पिककर्ज वाटपामधील दलालांबद्दल तक्रारी द्याव्यात *किशोर तिवारी यांचे आवाहन *दलाल असलेल्या बँकांवर कारवाई यवतमाळ, दि. 29 : शेतीचा हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. ही बाब हेरून बँकांमध्ये दलाल सक्रिय झाले आहेत. पिककर्ज वाटपामध्ये हे दलाल मध्यस्थांची भूमिका निभावत असून त्यापोटी शेतकऱ्यांकडून काही टक्के रक्कम घेत आहेत, हे प्रकार थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येऊन मिशनकडे याबाबत तक्रार द्यावी, असे आवाहन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोत तिवारी यांनी केले आहे. पिककर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी प्रत्येक जिल्हात आढावा बैठका व मेळावे एप्रिलपासुन सुरू केल्यानंतरही २७ जुनपर्यंत  मराठवाडा व विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात केवळ ४०  टक्केच पिककर्ज वाटप केले आहे. यापूर्वी मे महिन्यातच सरकारने खरीप हंगाम २०१४ -१५ व २०१५-१६ चे संपुर्ण पिककर्जाचे पुनर्वसन करून पाच वार्षिक हप्ते करून व्याज सवलत दिली होती. या सर्व पात्र शेतकऱ्यांना नवीन पिककर्ज देण्याचे आदेश सर्व बँकांना नाबार्डमार्फत रिझर्व्ह बँकेने २२ मे दिले होते. मात्र राष्ट...
शेतक ऱ्यां ची मुले बनणार सनदी अधिकारी * तीन शेतकरी पुत्रांना स्‍पर्धा परीक्षा तयारीसाठी मदत यवतमाळ , दि.  २९ : यशाची शिखरे गा ठ ण्‍याची धडपड करणरी शेतकरी कुटुंबातील पाल्‍यांना मदत करण्यात येत आहे. बळीराजा चेतना अभियान आणि जिल्‍हा पोलिस प्रशासन यांच्‍या संयुक्‍त उपक्रमातून तीन शेतकरी पुत्रांना स्‍पर्धा परीक्षेची तयारी करण्‍यासाठी प्रत्‍ये की ५ हजार रूपयां ची मदत करण्‍यात आली आहे . जिल्‍हा पोलिस प्रशासनाकडून अभियानास मिळालेल्‍या निधीतून ही मदत करण्‍यात आली आहे. या शेतकरी पुत्रांना जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह , जिल्‍हा पोसिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी पाल्‍यांना  पुढील वाटचालीसाठी शुभेच्‍छा दिल्‍या.  जि ल्ह्या तील शेतकरी कुटुंबातील जे पाल्‍य परिक्षेची तयारी करीत आहे त, ज्‍यांनी एखा द्या परिक्षेची पूर्व परिक्षा उत्तीर्ण केली असून मुख्‍य परिक्षा किंवा मुलाखत देण्‍यास काही आर्थिक अडचणी आहे. अशा तालुक्‍यातील दोन शेतकरी पाल्‍यांना बळीराजा चेतना अभियान आणि जिल्‍हा पोलिस प्रशासन अंतर्गत स्‍पर्धा परिक्षेची तयारीसाठी  मदत करण्‍याचा निर्णय जिल्‍हा प्र...
मानवसेवा, बालकल्याण व नैपुन्य पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित यवतमाळ, दि. 28 : राजीव गांधी मानवसेवा पुरस्कार, राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार व विशेष नैपुन्य पुरस्कारासाठी इच्छुकांकडून दिनांक 5 जुलैपर्यंत तीन प्रतीत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. राजीव गांधी मानवसेवा 2016, विशेष नैपुन्य पुरस्कार 2016 साठी तर राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार सन 2015 व 2016 साठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे. सदर पुरस्कारासाठी राष्ट्रीय निवड समितीमार्फत बालकांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीन व्यक्तींची निवड केली जाणार आहे. पुरस्कारासाठी बालकांच्या क्षेत्रात दहा वर्षांपेक्षा अधिक उल्लेखनिय कार्य केलेले असणे आवश्यक आहे. हे काम गुणवत्तापूर्ण व महत्वाचे असावे. कोणत्याही संस्थेचे मानधन, वेतन घेणारे व्यक्ती निवडीसाठी पात्र ठरणार नाहीत. बालविकास, बालसंरक्षण, बालकल्याण या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली असणे आवश्यक आहे. या योजनेची माहिती www.wcd.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी यासाठी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयात दिनांक 5 जुलैपर्यंत तीन प्रतीत अर्ज सादर करावे, असे जिल्हा‍ मह...
कामगारांसाठी बाभुळगाव येथे गुरूवारी नोंदणी शिबीर   यवतमाळ, दि. 28 : महात्माक गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या बांधकाम मजुरांना महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदीत करून घेण्यासाठी गुरूवारी, दि. 30 जून रोजी बाभुळगाव येथे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर पंचायत समितीमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार आहे. या शिबीरामध्ये केवळ मनरेगा अंतर्गत कामगारांची नोंदणी केली जाईल. इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन नोंदणी करावी. मागील 12 महिन्यात किमान 90 दिवस काम केलेल्याच कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे. मंडळामध्ये नोंदणीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड, जन्म तारखेचा पुरावा, ओळखपत्र, रहिवासी पुरावा, राशन कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकची छायांकित प्रत आणि चार पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. नोंदणी शुल्क 85 रूपये भरून नोंदणी करण्यात येणार आहे. मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांनी वरीलप्रमाणे कागदपत्...
कडबाकुटी यंत्रासाठी अर्ज करावेत   यवतमाळ, दि. 28 : चाऱ्याचा अपव्य टाळणे आणि दुध उत्पादनात वाढ होण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विजेवर चालणारे कडबाकुट्टी यंत्र वापरास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येणार आहे. इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी 15 जुलै पर्यंत संबंधित पशूधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या योजनेत 50 टक्के अनुदानावर दोन एचपी कडबाकुट्टी यंत्र वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी विहित नमुन्यातील अर्ज पशुधनविकास अधिकारी विस्तार यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आले असून, या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे किमान पाचपेक्षा अधिक पशुधन आणि सिंचनाची व्यवस्था असावी लागणार आहे. संकरीत व सुधारीत पशुधन असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच इच्छुक लाभार्थ्यांकडे वीज जोडणी असावी लागणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी आणि पशूपालकांनी पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्...
महागाव, झरी जामणी तालुक्यातील रास्तभाव दुकानासाठी अर्ज आमंत्रित यवतमाळ, दि. 28 : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्यावतीने महागाव तालुक्यातील फुलसावंगी आणि महागाव तसेच झरी जामणी तालुक्यातील माथार्जून येथे रास्तभाव दुकानासाठी पात्र स्वयंसहायता गटाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 6 जुलै पूर्वी अर्ज करावे लागतील. रास्तभाव दुकाने स्वयंसहायता गटाना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीचा अर्ज संबंधित तहसिल कार्यालयामधून 100 रूपयांना उपलब्ध असणार आहे. तसेच सबंधित गावातीलच स्वयंसहायता गटच यासाठी पात्र ठरणार आहेत. महिलांचा गट उपलब्ध नसल्यास पुरूष गटाचा विचार करण्यात येणार आहे. परतफेडीची क्षमता 80 टक्के असणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्जासोबत गटाची नोंदणी प्रमाणपत्र, व्यवसासाच्या जागेच्या मालकी, भाडेपत्राची कागदपत्रे, बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेडची प्रमाणपत्र, तपासणी केलेल्या संस्थेचा अहवाल आदी माहितीसह अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे. 00000
एड्स प्रतिबंध कार्यक्रमांचा आढावा यवतमाळ, दि. 28 : जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण समितीची बैठक बुधवारी, दि. 22 जून रोजी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेमध्ये जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण समितीच्या पथक सदस्यांनी जिल्ह्यातील एड्स प्रतिबंधक कार्यक्रमाचा मागील एक वर्षाचा आढावा सादर केला. एप्रिल 2015 ते मार्च 2016 या कालावधीत एचआयव्ही तपासणी झालेल्या एकूण रूग्णांपैकी 122 महिला रूग्ण असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच 49 वरील वयोगटात एचआयव्ही बाधितांची संख्या अधिक आहे. ही बाब गांभिर्याने घेऊन जिल्हाधिकारी यांनी सर्व सेवा सुविधा देणाऱ्या संस्था आणि केंद्रांनी जिल्ह्यातील सर्व पातळीवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची सुचना केली. यावेळी जिल्ह्यातील कार्यरत विविध सेवा देणाऱ्या केंद्रांच्या कार्य आणि प्रगतीची माहिती देण्यात आली. एचआयव्ही संसर्गित, प्रभावित, अनाथ व असुरक्षित जोखीमीतील बालकांसाठी सामाजिक संरक्षण प्रकल्प, एआरटी केंद्र, सीटीसी याबाबत चर्चा करण्यात आली. अनाथ व असुरक्षित बालकांना विविध सामाजिक संरक्षण योजनासोबत जोडण्याच्या सूचना दे...